Zilla Parishad President Dharti Deore during an inspection during the academic level determination test at Zilla Parishad School. Neighbors other dignitaries, teachers.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: झेडपी अध्यक्षा धरती देवरेंकडून अध्ययनस्तर चाचणीचा आढावा; आर्वी ZP शाळेसह आरोग्य केंद्राला अचानक भेट

Dhule News : जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे यांनी आर्वी (ता. धुळे) येथील जिल्हा परिषद मराठी शाळेस या चाचणीदरम्यान अचानक भेट देत तपासणी केली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे शालेय वेळेत अध्ययनस्तर निश्चिती करण्याकरिता चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे यांनी आर्वी (ता. धुळे) येथील जिल्हा परिषद मराठी शाळेस या चाचणीदरम्यान अचानक भेट देत तपासणी केली. (Dhule ZP President Dharti Devere Review of Academic Level Test)

जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व अधिकारी व शिक्षण यंत्रणेला संबंधित शाळांमध्ये अध्ययनस्तर निश्‍चिती चाचणी पारदर्शक करण्याची सूचना देण्यात आली होती. त्याअंतर्गत जिल्हा परिषद अध्यक्षा देवरे यांनी शाळेची तपासणी केली.

या वेळी जिल्हा परिषद सदस्या शोभा पाटील, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या मंजूषा क्षीरसागर, पंचायत समिती सदस्या लताबाई शेणगे, गटशिक्षणाधिकारी व्ही. बी. घुगे, आर्वी केंद्रप्रमुख जितेंद्रसिंग झाल्टे, किशोर हालोर, जिभाऊ शेणगे, माजी सरपंच संजय चौधरी, नाना खैरनार, शांताराम माउली, रोहिदास तलवारे, मुख्याध्यापक उमेश सांगळे व शिक्षक उपस्थित होते. (latest marathi news)

दरम्यान, या भेटीच्या निमित्ताने अध्यक्षा देवरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रालाही भेट देत आरोग्य केंद्राचा आढावा घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भौतिक सुविधा तसेच प्रसूती विभाग, बुडीत मजुरी योजना लाभार्थी याबाबत त्यांनी माहिती घेतली, कामाची पाहणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्र समाविष्ट गावांचा आरोग्य सुविधांबाबत जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी माहिती दिली. या वेळी डॉ. भागवत लोंढे, डॉ. महेश ढवळे, डॉ. मित्तल पाटील यांनी कार्य आढावा सादर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Crypto Scam : पोलिसांना गुंगारा देणारी डॉक्टर जोडी गजाआड! मिरजेत हाय-प्रोफाइल छापेमारी; इब्राहिम आणि जास्मिनच्या घरात नेमकं काय सापडलं?

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा ताजा भाव

T20 WC: वानखेडे स्टेडियमवर शांतता ठेवू... भारताविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडच्या स्टार खेळाडूची वॉर्निंग

Latest Marathi News Live Update : दुबईत अडकलेल्या पुणेकरांची माहिती राज्य सरकारकडून संकलित

'कुत्र्याने माझ्या मांडीला चावा घेतला आणि...' मुळशी पॅटर्नमधल्या पिट्या भाईने सांगितली भयंकर घटना, म्हणाला...'माझ्याजागी जर...'

SCROLL FOR NEXT