Recruitment esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule ZP Recruitment 2023 : जिल्हा परिषदेत आजपासून साडेतीनशेवर पदांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

Dhule ZP Recruitment 2023 : जिल्हा परिषदेत ऑनलाइन पद्धतीने वर्ग तीनच्या ३५२ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाईल. यात २५ ऑगस्टपर्यंत पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतील.

उमेदवारांच्या शंकानिरसनासाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी शुक्रवारी (ता. ४) दिली. श्री. गुप्ता यांनी दालनातील पत्रकार परिषदेत ३५२ पदांसाठीच्या भरती प्रक्रियेची विस्तृत माहिती दिली.

जिल्हा परिषदेच्या विविध आस्थापनांवरील गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी शनिवारी (ता. ५) जाहीर प्रकटन होईल. शासनाच्या नियुक्त आयबीपीएस कंपनीमार्फत परीक्षा प्रक्रिया राबविली जाईल. (Dhule ZP Recruitment 2023 Recruitment for more than 350 posts from today news)

त्यानंतरची पुढील प्रक्रिया जिल्हा परिषदेतमार्फत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार होईल. इच्छुक उमेदवारांनी https://icpsonline.ict.in/zpvp jun२३/ या लिंकवर २५ ऑगस्टच्या रात्री ११.५९ पर्यंत ऑलनाइन अर्ज करावा.

जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील, आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी तसेच शर्ती आदींबाबत जिल्हाधिकारी कार्यालय (धुळे) येथील संकेतस्थळ https://dhule.gov.in व धुळे जिल्हा परिषदेच्या https://dhulezp.mahapanchyat.gov.in संकेतस्थळावर ५ ते २५ ऑगस्टदरम्यान कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वेबसाइट हँग होण्याची समस्या निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. एकाच पदासाठी उमेदवारांनी वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज करू नये. कारण परीक्षेचा दिवस एकच असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

परीक्षा शुल्क खुल्या गटासाठी एक हजार रुपये, तर इतरांसाठी ९०० रुपये आहे. बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरूपात परीक्षा असेल. २०० गुणांसाठी १०० प्रश्न असतील, असेही श्री. गुप्ता यांनी सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अकलाडे उपस्थित होते.

पदनिहाय भरती अशी

आरोग्य पर्यवेक्षक एक पद, आरोग्यसेवक पुरुष ५९ पदे, आरोग्य परिचारिका २०६, औषधनिर्माण अधिकारी सात, कंत्राटी ग्रामसेवक पाच, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) सहा, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) एक, मुख्यसेविका/पर्यवेक्षिका आठ, पशुधन पर्यवेक्षक ११, प्रयोगशाळा तंत्रज्ञ तीन, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) तीन, विस्तार अधिकारी (कृषी) एक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाट बंधारे) ४१ अशा ३५२ पदांसाठी ही भरतीप्रक्रिया राबविली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT