Zilla Parishad school ground due to infiltration of drain water ponds. In the second photograph, group education officer V. B. Ghuge, Education Extension Officer B. A. Bhamre etc. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule ZP School : जि.प. शाळेची नाल्याच्या पाण्याने होतेय दुरवस्था

ZP School : जिल्हा परिषद शाळा क्रमांक चारमध्ये नाल्याचे पाणी शिरत असल्याने इमारतीसह पटांगणाची मोठी दुरवस्था होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule ZP School : येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक चारमध्ये नाल्याचे पाणी शिरत असल्याने इमारतीसह पटांगणाची मोठी दुरवस्था होत आहे. या शाळेला गटशिक्षणाधिकारी व्ही. बी. घुगे आणि शिक्षणविस्ताराधिकारी बी. ए. भामरे यांनी भेट दिली. त्यांनी शाळा इमारतीसह पटांगण दुरवस्थेची पाहणी केली. येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक चार गावाच्या पूर्वे दिशेस आहे. ही शाळा पांझरेच्या कालव्यालगत आहे. (ZP School is in bad condition due to water from drain )

शाळेकडे शेतीशिवारातील नाला व अर्ध्या गावाचे पाणी जाते. पंधरा-वीस मिनिटेही पाऊस झाला तरी या शाळेच्या पटांगणात पाणी शिरते व तळे साचते. चिखल तयार होतो. विद्यार्थ्यांसह शिक्षकांना वर्गात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. नाल्याला पूर आल्याने तर शाळेच्या प्रत्येक वर्गखोल्यांमध्ये पाणी जाणे नेहमीचेच झाले आहे. दोन वर्षांपूर्वी नाल्याला आलेल्या पुरामुळे शालेय साहित्याचे मोठे नुकसान झाले होते. (latest marathi news)

ग्रामपंचायतीने द्यावे लक्ष

शाळेची इमारत ग्रामपंचायतीची आहे. इमारतीची दुरवस्था होत आहे. शाळेजवळून वाहणाऱ्या नाल्याचे खोलीकरण केले पाहिजे. शाळेजवळ हा नाला गटारीसम झाला आहे. नाल्याच्या बाजूने संरक्षण भिंत होणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीने या शाळेच्या समस्या सोडविण्याची मागणी पालकांमधून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT