उत्तर महाराष्ट्र

‘बुलेट’स्वारांच्या ‘फटाक्‍यां’मुळे धुळेकर त्रस्त

विजय शिंदे

धुळे - शहरासह जिल्ह्यात दुचाकी वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. यातही ‘बुलेट’ची क्रेझ तरुणाईला भुरळ घालणारी ठरली आहे. मात्र, याच बुलेटस्वारांच्या सायलेन्सरमधून निघणाऱ्या ‘फटाका’सदृश आवाजांमुळे धुळेकर पुरते त्रस्त झाले आहेत. विशेषतः रस्त्याने जाणारे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व महिला आवाजामुळे भयभीत होतात. यातून अपघातांची शक्‍यताही बळावत असून, काही दिवसांपासून वाढीस लागलेल्या या गैरप्रकाराला आळा घालण्यास पोलिस मात्र अपयशी ठरत आहेत. यामुळे सोकावलेल्या अशा बुलेटस्वारांसह ‘फॅन्सी नंबर प्लेट’च्या वाहनधारकांवर कारवाईची, तसेच जी टारगट मुले असे प्रकार करतात त्यांना त्यांच्या पालकांनीही आवर घालण्याची गरज व्यक्त होत आहे.

‘बुलेट’चा होतोय गैरवापर
दुचाकी वाहनांत अधिक किंमत असूनही ‘बुलेट’ची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. नोकरदार, महाविद्यालयीन युवक, व्यावसायिकांची ‘बुलेट’ला पसंती आहे. ती कोणीही खरेदी करावी. मात्र, ती चालविताना वाहतूक नियमांचे उल्लंघन होणार नाही, याचीही काळजी घेण्याची गरज आहे. मात्र, काही टारगट युवकांनी याच नियमांना खो देत जणू उच्छाद मांडला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर तसेच ‘सायलेंट झोन’ असलेल्या शाळा-महाविद्यालये, दवाखाने, हॉस्पिटल अशा शांतता प्रतिबंधित क्षेत्रात या ‘बुलेट’स्वारांकडून ‘शाईनिंग’च्या नादात मर्यादा ओलांडली जात आहे. या युवकांकडून ‘बुलेट’च्या सायलेन्सरमध्ये अवैधरीत्या बदल करत तो आवाज फटाक्‍यांसारखा घुमेल, अशी व्यवस्था केली जात आहे. यामुळे बेभानपणे रस्त्याने जाणाऱ्या या बुलेटस्वारांकडून भर गर्दीत ‘फटाका’सदृश आवाज काढून नागरिकांमध्ये दहशत बसविण्याचा प्रकार केला जात आहे. यातून अन्य वाहनचालकही बिथरून अपघातांची शक्‍यताही व्यक्त होत आहे.

आबालवृद्धांना होतोय त्रास
या टारगट बुलेटस्वारांकडून वेळेचे बंधन न पाळता असे प्रकार केले जात आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी, महिलांना त्रास सहन करावा लागतो. वाहतूक पोलिसांसह पोलिस प्रशासनाने अशा बुलेटस्वारांवर कठोर कारवाई करावी, सायलेन्सरमध्ये अवैधपणे बदल करून देणाऱ्या गॅरेजचालकांवरही कारवाई करावी, अशी आग्रही मागणी होत आहे. 

फॅन्सी नंबर प्लेटचाही उच्छाद
काही महाभागांकडून नियमानुसार असलेल्या नंबर प्लेटमध्येही परस्पर बदल नियमांची मोडतोड केली जात आहे. अनेक वर्षांपासून हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. विशेष म्हणजे अनेक दुचाकी, चारचाकी वाहनांवर नंबरऐवजी ‘दादा’, ‘भाऊ’, ‘बाबा’ ‘सर’, ‘बॉस’ अशी नावे तयार करून वाहने मिरविली जात आहेत. याकडे पोलिसांसह उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही दुर्लक्ष होत आहे. यामुळे अशा नंबर प्लेटच्या वाहनाधारकाकडून काही अपघात झाल्यास त्याला नंबर प्लेट नसल्याने त्याची ओळखही पटू शकणार नाही, असा धोका निर्माण झाला आहे. यामुळे अशा वाहनधारकांसह नंबर प्लेट तयार करून देणाऱ्या ‘रेडियम’ कारागिरांवरही कारवाईची वेळ आली आहे. 

फटाकेसदृश आवाज काढणाऱ्या ‘बुलेट’स्वारांसह फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनधारकांवर ठिकठिकाणी नाकाबंदी करून शहर वाहतूक शाखेच्या मदतीने तत्काळ कारवाई केली जाईल. तसेच गरज पडल्यास फॅन्सी नंबर प्लेट बनविणाऱ्या रेडियम विक्रेत्यांनाही नोटिसा दिल्या जातील.
- सचिन हिरे, जिल्हा पोलिस उपअधीक्षक, धुळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शेतकऱ्यांच्या DBT वर दसऱ्यापर्यंत मदत जमा करणार'; अजित पवार यांचे आश्‍वासन, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचीही दिली ग्वाही

Pune Traffic App : वाहनचालकांवर मोबाईलवरूनच कारवाई, ‘पुणे ट्रॅफिक’ ॲपला प्रतिसाद; आतापर्यंत ४२ हजार तक्रारी

Shivram Bhoje Death : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगाव येथे आज होणार अंत्यसंस्कार

Latest Marathi News Updates : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगावात आज अंत्यसंस्कार

Mumbai Monorail : मुंबईकरांसाठी मोठी बातमी ! मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद , MMRDA ने का घेतला निर्णय ?

SCROLL FOR NEXT