उत्तर महाराष्ट्र

पंतप्रधानांचे चित्रीकरण अभिषेकने केल्याची चर्चा

सकाळवृत्तसेवा

जळगाव - पंतप्रधान नरेंद्र मोदी धुळे येथे जाण्यासाठी जळगाव विमानतळावर आले असता तेथे पाइपमधून जामनेरच्या अभिषेकने व्हिडिओ चित्रीकरण केल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, हा अभिषेक नेमका कोण? याबाबत अद्याप उलगडा झालेला नाही. या प्रकरणी मंत्री आणि आमदारांच्या स्वीय सहाय्यकांचे मोबाईल जप्त केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ व्हायरल होताच जिल्हा पोलिस प्रशासन आणि गुप्तचर विभाग ‘ॲलर्ट’ झाला आहे. याबाबत सोमवारी विमानतळावर तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात बैठका झाल्याचे समजते. 

धुळे येथे विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी जळगाव विमानतळावर आले होते. चौघे विमानतळावर विमानातून उतरत असताना कुणीतरी सर्व एका पाइपमधून मोबाईलमध्ये चित्रित केले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुप्तचर यंत्रणा लागलीच ॲलर्ट झाली. जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सर्व प्रकारची कसून चौकशी करणार असल्याचे सांगितले.

ते स्वीय सहाय्यक कोण?
दरम्यान, पंतप्रधान जळगाव विमानतळावर आले असता त्याठिकाणी विमानतळाच्या पहिल्या केबिनमध्ये भिंतीलगत विद्यमान मंत्री व आमदारांचे काही स्वीय सहाय्यक व वाहन चालक उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आणि फोटो घेतले. या सर्व स्वीय सहाय्यक आणि चालकांचे मोबाईल जळगाव पोलिसांनी तपासकामी जप्त केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, बंदोबस्ताकामी त्यादिवशी मोठ्याप्रमाणात अधिकारी व कर्मचारी विमानतळावर तैनात करण्यात आले होते. त्यापैकी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील चौकशीसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलाविले असल्याचे समजते.

एसपींनी फोन उचलला नाही
याबाबत पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन घेतला नाही.

अभिषेक कोण?
पोलिसांनी आणि गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतरांच्या मोबाईलमधील सर्व व्हिडिओ ताब्यात घेतले आहे. त्यात पाईपजवळ मोबाईलमध्ये चित्रीकरण करीत असलेली व्यक्ती जामनेर येथील अभिषेक नामक असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता जामनेरमधील मंत्री, पदाधिकारी व कार्यकर्ता या नावाचा नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT