Sushil Kumar Pavara and officials while showing documents to Superintendent of Police Shrikant Dhiware in the case of victim Vasant Pavara. Neighbor Jyoti Pawara. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : पीडित वसंत पावरा यांची प्रकृती गंभीर; पोलिस अधीक्षक धिवरे यांच्याशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : दंगलीच्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू असल्याचा आरोप करून रविवारी (ता. ३) विषप्राशन केलेल्या वसंत पावरा यांची प्रकृती अद्याप गंभीर आहे.

चोवीस तास उलटूनही ते शुद्धीवर आलेले नाहीत. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवल्याची माहिती बिरसा फायटर्सच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.(Discussion with Superintendent of Police Dhiware where condition of victim Vasant Pavara is critical dhule news)

बिरसा फायटर्स संघटनेचे तालुकाध्यक्ष वसंत पावरा यांनी ३ डिसेंबरला सकाळी शेतात विषप्राशन केले होते. त्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ क्लिप आणि एका पोलिस अधिकाऱ्याशी संभाषणाची ऑडिओ क्लिप प्रसारित करून सांगवी पोलिसांकडून दंगलीच्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप केला होता.

विषप्राशन केल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यांच्यावर धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी (ता. ४) त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार झाले. ते अद्याप व्हेंटिलेटरवर आहेत.

पोलिस अधीक्षकांशी भेट

दरम्यान, बिरसा फायटर्सचे संस्थापक अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, प्रदेशाध्यक्ष मनोज पावरा, विभागीय अध्यक्ष विलास पावरा व पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. ४) पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा उपस्थित होत्या.

दंगलीच्या गुन्ह्याआड पोलिस सामाजिक कार्यकर्त्यांना लक्ष्य करीत असून, राजकीय दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. त्या संदर्भातील काही कागदपत्रेही त्यांनी श्री. धिवरे यांना दाखविली.

आततायीपणा नको

पोलिस अधीक्षक धिवरे यांनी पदाधिकाऱ्‍यांना सांगितले, की या प्रकरणात न्यायपूर्ण कार्यवाही केली जाईल. मात्र आत्महत्येच्या प्रयत्नासारखा आततायीपणा करू नका. दंगलीच्या गुन्ह्याबाबत पोलिस निःपक्ष कार्यवाही करतील.

संघटनेच्या आरोपात तथ्य आढळल्यास निश्चितच कठोर भूमिका घेऊ, कोणाचीही गय करणार नाही. पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालून घातक मार्ग अवलंबण्यापासून रोखावे, असे आवाहन श्री. धिवरे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT