Caste Certificate esakal
उत्तर महाराष्ट्र

Caste Certificate : 4 हजार 351 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटप; 'या' संकेतस्थळावर करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत १ ते ३० एप्रिल २०२३ दरम्यान राबविण्यात आलेल्या सामाजिक न्याय पर्व उपक्रमांतर्गत धुळे जिल्ह्यात चार हजार ३५१ विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले, अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव राकेश महाजन यांनी दिली. (Distribution of caste certificates to 4 thousand 351 students dhule news)

बारावी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी धुळे जिल्हा जात प्रमाणपत्र समितीतर्फे विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशात नारनवरे व ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली.

या विशेष मोहिमेत जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून ९६८ विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाइन निर्गमित करण्यात आले, तर धुळे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांच्याकडून तीन हजार ३८३ जात दाखले निर्गमित करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ऑनलाइन अर्ज भरा

ज्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या विद्यार्थ्यांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फार्मसी, विधी इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रम आरक्षित जागेवर प्रवेश घ्यावयाचा आहे व त्यांनी अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज ऑनलाइन भरलेले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्याचेही जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाइन अर्ज https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सर्व मूळ कागदपत्रे अपलोड करून ते अर्ज अपलोड केलेल्या मूळ कागदपत्रांच्या सत्यप्रतींसह (Hard Copy) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या नागरी सुविधा केंद्र येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत स्वत: किंवा वडील/भाऊ/बहीण/आई यांनी समक्ष जमा करावेत, जेणेकरून प्रकरणांवर समितीस वेळेत निर्णय घेता येईल, असे श्री. महाजन यांनी म्हटले आहे.

दलालांपासून सावध राहा

दरम्यान, अर्जदारांनी अर्ज भरताना स्वत:चा ईमेल व मोबाईल क्रमाकांद्वारेच अर्ज नोंदणी करावा. सर्व मूळ कागदपत्रे अपलोड करावीत व आपला युझर आयडी व पासवर्ड व्यवस्थित जतन करून ठेवावा. समितीने त्यांच्या प्रकरणावर निर्णय घेतल्यानंतर निर्णय/जात वैधता प्रमाणपत्र हे त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर प्राप्त होत असते.

त्यामुळे कोणत्याही अर्जदाराने त्रयस्थ व्यक्तीकडे संपर्क करू नये व त्रयस्थ व्यक्तीच्या आमिषास बळी पडू नये. अशा त्रयस्थ व्यक्तीकडून नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे अर्जदारांनी आपले अर्ज स्वतः व्यवस्थितरीत्या परिपूर्ण सादर करावेत. अन्य कोणत्याही कार्यालयाबाहेरील व्यक्तीशी संपर्क करू नये, असे आवाहनही जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव महाजन यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv News: अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन व कर्जबाजारीपणामुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्याने संपवले जीवन

Ladki Bahin yojana: बहिणींसाठी ‘ई-केवायसी’ रुसली; ‘कनेक्टिव्हिटी’सह संकेतस्थळ वारंवार बंद होत असल्याने मनस्ताप

IND vs PAK : B@#@# मुझे आंख दिखाती है! पाकिस्तानच्या फिरकीपटूने 'डोळे वटारले', हरमनप्रीत कौरने बघा काय केले? Video Viral

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

अरे वाह! 'या' मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, नवरा सुद्धा आहे 'या' मालिकेतील अभिनेता, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

SCROLL FOR NEXT