Rajarshi Shahu Maharaj Senior Literary, Member of the Committee giving information about Kalawant Mandhan Yojana.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : विविध कलावंतांनी मानधन योजनेचा लाभ घ्यावा; जिल्हा समितीचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा, पर्यटन विशेष सहाय्यक विभागातर्फे राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक, कलावंत मानधन योजना राबवली जाते. योजनेचा जिल्ह्यातील ३७२ लाभार्थी लाभ घेत आहेत. (District committee appeals to various artistes to take advantage of mandhan scheme dhule news)

योजनेच्या मानधनात दुप्पट वाढ झाली आहे. योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ कलावंत मानधन योजना जिल्हा समितीचे अध्यक्ष पारिजात चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केले. श्री. चव्हाण म्हणाले, राज्यातील वृद्ध साहित्यिक, कलावंत यांना मानधन देणारी योजना १९५४- १९५५ पासून शासनाने सुरू केली आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील शंभर कलावंत, साहित्यिकांची निवड केली जाते.

निवड करताना कलावंत, साहित्यिकांचे वय ५० वर असावे. गेल्या २५ वर्षांपासून साहित्य, कला क्षेत्रात त्याचे भरीव योगदान असावे. तसेच वार्षिक उत्पन्न ४८ हजारांच्या आत असावे. उदरनिर्वाह केवळ साहित्य आणि कलेवरच असावा. तो कुठल्याही दुसऱ्या शासकीय योजनांचा लाभार्थी नसावा. या सर्व बाबींच्या सत्यतेची हमी म्हणून त्यांना नोटरी करून द्यावी लागेल.

मानधनामध्ये वाढ

योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज तहसील कार्यालयात जमा करावे. अर्ज भरण्यासाठी शुल्क लागत नाही. अर्ज करणाऱ्यांना त्यांची कला समितीसमोर सादर करावी लागते. कोरोना काळातील एकूण ७५९ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यापैकी तीनशे प्रस्ताव मंजूर करावयाचे आहेत. आता मानधनात दुपटीने वाढ झाली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

राष्ट्रीय पातळीवर योगदान देणारे साहित्यिक, कलावंतांना पूर्वी दरमहा एक हजार चारशे रुपये मिळत होते. ते आता दोन हजार ७५० झाले आहे. राज्य पातळीवर योगदान देणाऱ्या कलावंतांना पूर्वी एक हजार २०० मानधन मिळत होते. आता दोन हजार ५५० रुपये मिळतील.

तसेच जिल्हास्तरावर योगदान देणाऱ्या कलावंतांना एक हजाराऐवजी दोन हजार २५० रुपये मानधन मिळेल, अशी माहिती समितीने पत्रकार परिषदेत दिली. समितीचे उपाध्यक्ष शाहीर श्रावण वाणी, सदस्य जगदीश देवपूरकर, पपीता जोशी, सुनंदा गोपाळ, चंद्रवदन चौधरी, रवींद्र चौधरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT