Hearing of beneficiaries under Pradhan Mantri Awas Yojana was conducted by Gharkul District Legal Services Authority. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : महिन्याच्या आत घरकुलाचे काम सुरू करा; जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा आदेश

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत धुळे तालुक्यात घरकुलाचा पहिला हप्ता घेऊनदेखील बांधकाम न करणाऱ्या लाभार्थ्यांची जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यासमोर सुनावणी घेण्यात येत आहे.

महिन्याच्या आता घरकुलाचे काम सुरू करा, असा आदेश लाभार्थ्यांना देण्यात आला. (District Legal Service Authority order to start work of Gharkul within month dhule news)

दरम्यान, या सुनावणीस गैरहजर राहणाऱ्या लाभार्थ्याविरुद्ध जिल्हा परिषदेमार्फत कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशारा धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी दिला.

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत धुळे तालुक्यातील घरकुल मंजूर केलेल्या लाभार्थ्यांपैकी पहिला हप्ता घेऊन एक वर्षाचा कालावधी झाल्यानंतरही काहींनी घरकुलाचे बांधकाम सुरू केलेले नाही. अशा लाभार्थ्यांची १६ ते १९ ऑक्टोबरदरम्यान जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे यांच्यासमोर न्यायालयीन वादपूर्व मध्यस्थी घेण्यात येत आहे.

याबाबत संबंधित लाभार्थ्यांना नोटीसदेखील बजाविण्यात आली आहे. रतनपुरा निमडाळे व शिरूड येथील जिल्हा परिषद गटातील लाभार्थ्यांची नुकतीच सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत जिल्हा विधी तथा दिवाणी न्यायाधीश जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे यांनी लाभार्थ्यांचे समुपदेशन करून त्यांना एक महिन्यात घरकुलाचे बांधकाम सुरू करण्याबाबत आदेशित केले. लाभार्थ्यांनीदेखील एक महिन्याच्या आत घरकुलाचे काम सुरू करू, असे लेखी लिहून दिले.

गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाई

दरम्यान, पहिला हप्ता घेऊन काम सुरू न केलेल्या सर्व लाभार्थ्यांना सुनावणीसाठी न्यायालयीन वादपूर्व मध्यस्थीबाबत नोटीस देण्यात आली आहे. नोटिशीत दिलेल्या तारखेच्या दिवशी सुनावणीसाठी संबंधितांनी उपस्थित राहावे. जे लाभार्थी सुनावणीसाठी गैरहजर राहतील त्यांच्याविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बाळासाहेब बोटे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Care : कोण म्हंटल माधुरी हत्तीचा विषय शांत झालाय, वनताराची टीम पुन्हा नांदणीत; आजच्या बैठकीत काय घडलं?

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rain-Maharashtra Latest Live News Update: हिंगोलीत येलदरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने सिद्धेश्वर धरणाचे 4 दरवाजे उघडणार

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT