Ganeshotsav 2023 : येत्या १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सव काळात नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे गणेशमंडळांना मदत व्हावी म्हणून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
त्यात मागील वर्षी गणेशोत्सव काळात डीजे/डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करणारे, गुलाल न उधळता मिरवणूक काढणाऱ्या मंडळांचा सत्कार, गणेशमंडळांच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे, एक खिडकी योजना, पाणपोई आदी सुविधांचा समावेश राहणार आहे.
गणेशभक्त व मंडळांनी डीजे-डॉल्बीमुक्त वातावरणात उत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले. (District Superintendent of Police Patil appeal to Celebrate ganeshotsav in DJ Dolby free atmosphere nandurbar news)
पोलिस ठाण्यात एक खिडकी योजना
गणेशोत्सव काळात गणेशमंडळांना गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या स्वरूपात सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारणी करणे, तात्पुरती वीजजोडणी, पालिकेशी संबंधित दुरुस्तीची कामे इत्यादी विविध प्रकारच्या परवान्यांसाठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना विविध ठिकाणी जावे लागते, त्यामुळे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिस अधीक्षक पाटील यांनी गणेशमंडळांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळण्यासाठी पोलिस दलातर्फे एक खिडकी योजना जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेऊन प्रत्येक पोलिस ठाणेस्तरावर एक खिडकी योजना सुरू केली आहे.
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर ज्या ठिकाणी गणेशमंडळाची स्थापना तसेच स्टेज, मंडप किंवा इतर देखावे उभारणार आहेत, त्या जागेची पोलिसांमार्फत पाहणी केली जाईल. रहदारीस अडथळा ठरणार नाही याची खात्री केल्यानंतरच गणेशमंडळाला परवाना दिला जाईल. मंडळाकडून परवानगीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क नसल्याने सर्व गणेशमंडळांनी एक खिडकी योजनेचा लाभ घेऊन परवानग्या प्राप्त करून घ्याव्यात.
एक कॅमेरा पोलिसांसाठी...
गणेशमूर्तीची स्थापना/विसर्जन मिरवणुकीच्या वेळी ध्वनिप्रदूषण निर्माण होईल अशी साधने (डीजे व डॉल्बी) यांचा वापर केल्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे त्यांचा वापर न करता पारंपरिक वाद्य वाजवून उत्साहात सण साजरे करावेत, त्याचप्रमाणे गणेशमूर्तीची स्थापना/विसर्जन मिरवणुकीत गुलालाच्या वापराने प्रदूषणाबरोबरच डोळे, त्वचेला इजा व इतर शारीरिक त्रास होतो.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यामुळे गुलालाचा वापर न करता फुलांच्या पाकळ्यांचा वापर करावा, जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी स्वच्छ व थंड पाण्याची नि:शुल्क व्यवस्था करण्यात येणार आहे,
तसेच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या एक कॅमेरा पोलिसांसाठी या योजनेंतर्गत मोठ्या किंवा गर्दी होणाऱ्या गणेशमंडळांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून श्रीगणेश स्थापनेच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील यांनी केले आहे.
गणेशमंडळांचा सत्कार
मागील वर्षी ज्या मंडळांनी डीजे/डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करणे, गुलालाचा वापर न करता फुलांच्या पाकळ्यांचा वापर करणे, गणेशस्थापना काळात उत्कृष्ट देखावा सादर करणे, वेळेच्या पूर्वी विसर्जन मिरवणूक संपविणे, श्रीगणेशाचे जागेवर विसर्जन करणे, गणेशोत्सव काळात समाजहितासाठी प्रबोधनपर उपक्रम किंवा कार्यक्रम राबविणे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून श्रीगणेश स्थापनेच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, पोलिस बंदोबस्ताशिवाय गणेशोत्सव साजरा करणे, स्वयंसेवक नेमून शिस्त पाळणारे गणेशमंडळ इत्यादी निकष पूर्ण करणाऱ्या सर्व व इतर नोंदणीकृत मंडळांचा नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे या आठवड्यात सत्कार करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.