उत्तर महाराष्ट्र

"गोल्डमॅन' दत्तूच्या  गावात दिवाळी 

भाऊसाहेब गोसावी

तळेगाव रोही (जि. नाशिक) - जकार्तामधील आशियाई क्रीडा स्पर्धेत रोइंग क्वाड्रापल गटात भारताला सुवर्णपदकाची कमाई करून देणाऱ्या संघातील रोइंगपटू "गोल्डमॅन' दत्तू भोकनळच्या चांदवड तालुक्‍यातील त्याच्या घरी अन्‌ गावात आज दिवाळी साजरी झाली. दत्तूचा समावेश असलेल्या संघाने सुवर्णयश मिळवल्याची माहिती दूरध्वनीवरून कुटुंबात पोचली अन्‌ कुटुंबीयांसमवेत तळेगाव रोहीकरांनी एकच जल्लोष केला. गावात फटाक्‍यांची आतषबाजी करत पेढ्यांचे वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. 

दिवंगत वडील बबन भोकनळ यांचे स्वप्न दत्तूने साकार केल्याचा आनंद एकीकडे होताच; पण त्याचवेळी दत्तूच्या वडिलांप्रमाणेच आई आशाबाई, आजी विठाबाई हयात नसल्याचे शल्य कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर लपत नव्हते. "दत्तूच्या यशाचा आम्हाला खूप अभिमान असून, त्याने देशाची मान उंचावली,' अशी प्रतिक्रिया दत्तूचे आजोबा रामदास भोकनळ यांनी व्यक्त केली. 

दुष्काळी चांदवड तालुक्‍यातील पाच हजार लोकसंख्येचे तळेगाव रोही हे गाव. आपल्या दत्तूला "मेडल मिळालं' असे प्रत्येक जण सांगत होता. आमच्या दत्तूने दुष्काळी गावाचं नाव जगाच्या नकाशावर कोरलं, याचा अभिमान आम्हाला आहे, असे प्रत्येक जण म्हणत होता. गावात घराघरामध्ये आनंदाचे वातावरण असून, सणासुदीप्रमाणे घरांमध्ये मिष्टान्न भोजनाचा बेत करण्यात आला. 

दत्तू तापाने फणफणला होता 
दत्तू पदकाची कमाई करणारच असा त्याच्या कुटुंबीयांना विश्वास होता. काल सायंकाळी दत्तूबरोबर त्याचे काका बाळासाहेब भोकनळ यांचे बोलणे झाले. तेव्हा तब्बेत बरी नसल्याचे त्याने सांगितले होते. काल सायंकाळी तापाने फणफणलेल्या दत्तूने मी पदकाची कमाई करेन, असा आत्मविश्वास त्याने कुटुंबीयांना दिला होता. हाच आत्मविश्‍वास त्याने सार्थ केल्याने कुटुंबीयांच्या आनंदाला उधाण आले होते. 

""दत्तू देशाबाहेरील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी जातो, त्या वेळी त्याला अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यात आर्थिक अडचणींचाही समावेश असतो. अशावेळी त्याला घरातून पैसे द्यावे लागतात. त्याची ही आर्थिक अडचण सरकारने देशाबाहेरील स्पर्धांवेळी दूर करायला हवी.'' 
- बाळासाहेब भोकनळ (दत्तूचे काका) 

""आशियाई क्रीडा स्पर्धेत दत्तूने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. आमच्या कुटुंबीयांचे स्वप्न साकार झाले आहे. दत्तू देशाला ऑलिंपिक स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवून देईल, असा विश्‍वास आम्हाला वाटतो आहे.'' 
- गोकूळ बबन भोकनळ (दत्तूचा भाऊ) 

""देशासाठीच्या दत्तू भोकनळच्या कामगिरीचा आम्हा ग्रामस्थांना मोठा अभिमान वाटतो आहे. आमच्या गावाचे नाव त्याने साता-समुद्रापलीकडे पोचवल्याने त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. 
- साधना भोकनळ (तळेगाव रोहीच्या सरपंच) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT