ekta kothavde accident
ekta kothavde accident 
उत्तर महाराष्ट्र

अखेर डॉक्‍टर होण्याचे स्वप्न राहिले अधुरे ! 

सकाळ वृत्तसेवा

पुणे/धरणगाव : भरधाव टेम्पोने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये वैद्यकीय शिक्षण (एमडी) घेणाऱ्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी दुपारी साडेबाराला कात्रज चौकात घडला. अपघातानंतर टेम्पोचालक टेम्पो रस्त्यावरच सोडून पळून गेल्याने कात्रज चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. डॉक्‍टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगत असणाऱ्या तरुणीचे अखेर स्वप्न भंगले आहे. 

एकता प्रभाकर कोठावदे (वय 29, रा. शनिवार पेठ) असे अपघातात मृत्युमुखी झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती मूळची जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्‍यात असलेल्या चांदसर गावची रहिवासी आहे. याप्रकरणी टेंपोचालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोठावदे या शनिवारवाडा परिसरात राहतात. शहरातील एका नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचे वैद्यकीय शिक्षण (एमडी) सुरू होते. सोमवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास कोठावदे या त्यांच्या दुचाकीवरून कात्रज चौकातून स्वारगेटच्या दिशेने निघाल्या होत्या. त्यांची दुचाकी राजीव गांधी राष्ट्रीय प्राणी संग्रहालयासमोर आली, त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या 
मालवाहू टेम्पोने कोठावदे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यांनी हेल्मेट परिधान केले होते, मात्र टेम्पोची जोरदार धडक बसल्याने त्या खाली कोसळल्याने डोक्‍यातील हेल्मेट खाली पडले. त्यानंतर त्यांच्या डोक्‍यावरून टेंपोचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक वैशाली भोसले व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर टेम्पोचालक टेम्पो रस्त्यातच सोडून पळून गेला. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. 

गावावर शोककळा... 
एकता कोठावदे हिचे वडील प्रभाकर वसंत कोठावदे हे प्रगतिशील शेतकरी असून, चांदसर येथे त्यांचे मेडिकल दुकानही आहे. तर चांदसरचे माजी उपसरपंच व कृषी केंद्राचे संचालक कुणाल कोठावदे (वाणी) यांची ती बहीण आहे. एकता हिने नाशिक येथून "बीएएमएस'चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुण्यातील टिळक विद्यापीठातून ती आयुर्वेदात एम. डी. करीत होती. आता तिसऱ्या वर्षाला होती. मुलगी डॉक्‍टर होण्याचे आई-वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास येत असतानाच काळाने झडप घातली. अखेर हे स्वप्न अधुरेच राहिले. एकता हिच्या अकाली जाण्याने आई-वडिलांसह नातेवाइकांना मोठा धक्का बसला असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, एकताचा मृतदेह पुण्याहून पहाटे गावात पोहोचले व उद्या (ता. 26) सकाळी आठला चांदसर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT