Vijaykumar Gavit esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : नंदुरबारला साकारणार आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रबोधिनी : डॉ. विजयकुमार गावित

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये खेळाचे गुण उपजत असतात. त्यांना जर योग्य संधी व सुविधा मिळाल्या, तर ते क्रीडा क्षेत्रात देशाचे नाव जागतिक स्तरावर गाजवू शकतात, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर आदिवासी खेळाडूंनी दाखवले आहे.

त्यामुळे नंदुरबारला आंतरराष्ट्रीय आदिवासी क्रीडा प्रबोधिनी साकारण्याचा विचार असून, त्यात सांघिकसोबत वैयक्तिक क्रीडा प्रकाराचे धडे दिले जातील, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली. (Dr Vijayakumar gavit statement about International Sports Prabodhini will be in nandurbar news )

शनिवारी (ता. ९) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्ह्यातील सर्व तालुका क्रीडासंकुलांच्या निर्मितीसंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, तहसीलदार नितीन गर्जे, नंदुरबार पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी नितीन कापडणीस, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, तालुका क्रीडा अधिकारी व जिल्ह्यातील सर्व पालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

मंत्री डॉ. गावित म्हणाले, की आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये उत्तम कलागुण, बौद्धिक क्षमता आहे. त्यांना क्रीडाविषयक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील पहिली आदिवासी क्रीडा प्रबोधिनी नाशिकमध्ये सुरू झाली आहे. त्याच धर्तीवर ती नंदुरबारमध्ये सुरू करण्याची बाब विचाराधीन आहे.

त्यात ८० टक्के आदिवासी व २० टक्के इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा व काटकता असते, विविध क्रीडा प्रकारांचे कौशल्य नैसर्गिकरीत्या असते. वैयक्तिक क्रीडा प्रकारात पदके मिळविण्याची संधी जास्त असल्याने या प्रबोधिनीत कनो-कायाकिंग, नेमबाजी, जिम्नॅस्टिक्स, कुस्ती, धनुर्विद्या, बॉक्सिंग, स्विमिंग या खेळांचाही समावेश असेल. स्वतंत्र प्रशिक्षकाच्या नियुक्तीसोबतच पोषक आहारावरही लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसह शाळेत जाण्या-येण्यासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध असेल. प्रत्येक तालुक्यातील क्रीडासंकुलांच्या निर्मितीसाठी येणाऱ्या सर्व अडचणींचे निराकरण करून त्यांचे बांधकाम वर्षभरात पूर्ण करण्यात येईल. धडगाव, अक्कलकुवा, तळोदा क्रीडासंकुलांच्या प्रस्तावित जागेसंदर्भात तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा.

तसेच नंदुरबार, नवापूर, शहादा येथील संकुलांच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला असल्याने त्यांचे कामे सुरू करण्यात यावीत. शहादा क्रीडासंकुलात ४०० मीटरचा ट्रॅक तयार करण्यासाठी आराखडा तयार करावा.

नंदुरबार क्रीडासंकुलाच्या आजूबाजूला असलेल्या सर्व व्यापाऱ्यांना गाळे देण्यात येणार असून, त्याबाबत सर्व व्यापाऱ्यांशी करार केला जाईल. ज्यांना अधिकचे गाळे पाहिजे असतील त्यांना लिलावात सहभागी होता येईल, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup बाबत ICC आज मोठा निर्णय घेणार, जय शहा बांगलादेशला धक्का देण्याच्या तयारीत

माेठी अपडेट! ‘शालार्थ’मध्ये कागदपत्रे अपलोड न केल्यास थांबणार वेतन; १५ फेब्रुवारीपासून खासगी अनुदानित शाळांवर निर्बंध..

Latest Marathi news Live Update: आयएस आयपीएस अधिकारी दहा हजार शाळा आणि 6 लाख विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षराचे धडे देणारा ध्येयवेडा शिक्षक

Pune : रोडरोलरनं ४ वर्षीय मुलाला चिरडलं, रस्त्याच्या डांबरीकरणावेळी भीषण दुर्घटना

Gold Silver Price Update : सोने ४ हजार तर चांदी १५ हजारांनी घसरली, पण पुन्हा दर वाढले; मागच्या चार दिवसांतील जाणून घ्या स्थिती

SCROLL FOR NEXT