nashik
nashik 
उत्तर महाराष्ट्र

आईसह कुटुंबाने पाहिलेले स्वप्न 23 वर्षांच्या झुंझीनंतर साकारले!

संतोष विंचू

येवला : पाच महिन्यांपूर्वी येथे पत्रकार संघाच्या काव्यसंमेलनात गमतीने बोलतांना नरेंद्र दराडे म्हणाले होते, पुढील वर्षी मी आमदार असेल, इतका विश्वास त्यांना नाशिक मधील विजयावर होता. त्याला कारणही तसेच आहे. तब्बल 23 वर्षापासून त्यांनीच नव्हे तर आईसह भावांडे व कुटुंबाने पाहिलेले स्वप्नपूर्तीची जिद्द त्यामागे होती.

1995 पासून आमदारकीचे स्वप्न उराशी बाळगून आपली राजकीय वाटचाल करणाऱ्या दराडेनी जगण्याशी तशी कडवी झुंझ दिली. मात्र मनी वसे ते स्वप्नी दिसे. या उक्तीप्रमाणे आज अखेर त्यांच्या या स्वप्नाला पूर्णविराम मिळाला आहे.    

अतिशय हालाखीची परिस्थिती असताना दराडे परिवाराने जिद्दीच्या बळावर शून्यातून विश्व निर्माण करून उभे केलेले वलय म्हणजे एकीच्या बळाचे फळ आहे,हे नक्की! सर्वसामान्य कुटुंब असल्याने नोकरीशिवाय पर्याय नसल्याने दराडे यांनी एचएल मध्ये नोकरीची सुरुवात केली.पण समाजसेवेची आवड त्यांना स्वस्थ बसू देईना.यातूनच व्यवसाय सुरु करत नोकरीला अलविदा करून संतोष जनसेवा मित्र मंडळाच्या माध्यमातून तालुक्यात कार्यकर्त्यांचे जाळे विणले. 1995 ला त्यांनी हे स्वप्न पूर्तीसाठी काम हाती घेतली आणि 1999 मध्ये कॉंग्रेस पक्षाकडून येथे उमेदवारी केली.यावेळी स्थानिक राजकीय गटबाजीचे बळी ते ठरले आणि दराडेची हवा असतांना ते केवळ 221 मतांनी पराभूत झाले होते.

खरे तर आई आसराबाई यानीही नरेंद्रभाऊंनी या तालुक्याचे आमदार व्हावें असे स्वप्न पहिले होते.या पराभवानंतर पुढे दराडे यांच्या मातोश्री आसराबाई यांचे निधन झाल्याने आईला आपला मुलगा आमदार होतांना पाहता आले नाही.

दराडेनी पुन्हा जोमाने 2004 साठीची तयारी केली. मात्र, तयारी जोरदार असतांना नशिबाने त्यांना हुलकावणी दिली आणि ऐनवेळी कॉंग्रेसने हि जागा छगन भुजबळांसाठी सोडली आणि भुजबळांच्या एन्ट्रीने दराडे यांचे स्प्वनाचा  चक्काचूर झाला.तेव्हाही भुजबळांनी त्यांना विधानपरिषदेचा शब्द दिला होता पण तो पुढे खरा ठरला नाही.तर भुजबळामुळे 2004 सह 2009 व 2014 या तिन्ही टर्मला त्यांना भुजबळांच्या पाठीशी उभे राहण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.याचमुळे २०१६ मध्ये शिवसेनेत प्रवेश करीत दराडे यांनी विधानपरिषदेसाठी तयारी चालविली होती.पक्षाने त्यांना शब्द दिला होता व तो पक्षासह दराडे कुटुंबाच्या प्रयत्नाने आज सफल झाला आहे. गेले 23 वर्ष एका खुर्चीसाठीची दराडेची जी महत्वकांक्षा होती ती अखेर आज पूर्ण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT