उत्तर महाराष्ट्र

रस्त्यांच्या कामामुळे नांदगावच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम, नागराध्यक्षांचा सर्वपक्षीय रास्तारोको 

सकाळवृत्तसेवा

नांदगाव - रस्त्याच्या कामामुळे माणिकपुंज धरणातून  शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्या वारंवार उतू लागल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. याच्या निषेधार्थ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या नेतृत्वखाली आज सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 

या आंदोलनामुळे औरंगाबाद-येवला मालेगाव-, मनमाडकडे जाणाऱ्या राज्यमार्गावरील वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जळगाव ते नांदगाव या नव्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असून, रस्त्याच्या समांतर असलेल्या पालिकेच्या मुख्य जलवाहिन्या या कामांमुळे उखडल्या गेल्याने मोठ्या प्रमाणात गळती झाली. यामुळे हजारो लिटर पाण्याचा नासाडी होत असल्याने नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी लक्ष वेधण्यासाठी रास्तारोको आंदोलन करण्याचा प्रशासनाला इशारा दिला होता. खराब झालेली जलवाहिनी पीव्हीसी ऐवजी सदर जलवाहिनी लोखंडी (जीआय) बनवून द्यावी अशी मागणी पालिकेने केली. मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला कबुल करून नंतर पीव्हीसी पाइपचा वापर केल्याने शहराच्या पाणी वितरण व्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊन गेल्या पंधरा दिवसापासून पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. अभूतपूर्व पाणी टंचाई निर्माण झाली आहे. 

नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी अधिकारी दिलेला शब्द पळत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या यंत्रणेशी आंदोलनस्थवरून दूरध्वनीद्वारे सवांद साधून पाणी वितरण सुरळीत झले. नाहीतर शिवसेना स्टाईल उत्तर देऊ. असा इशारा देत अँड सचिन साळवे यांनी आंदोलनामागची भूमिका विशद केली. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता सचिन आहेर यांनी उपअभियंता सोनवणे यांच्याशी झालेल्या चर्चेचा हवालाही अॅड. साळवे यांनी दिला. 

राष्ट्रवादीचे संतोष गुप्ता मनसेचे योगेश सोनार, रिपाईचे कपिल तेलुरे यांनीही या आंदोलनाला आपले समर्थन जाहीर केले. पालिका कार्यालयापासून निघालेल्या मोर्चात शिवसेनेचे तालुकाप्रमुख किरण देवरे यांच्यासह नगरसेवक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील पाण्याच्या प्रश्नावरील रास्ता रोको झाल्यानंतर रास्ता रोको झाल्यानंतर आंदोलकातली नेते मंडळी व कार्यकर्ते १०० फुटावर असलेल्या नार पारच्या सभेत मार्गदर्शनासाठी गेले. नांदगावकरांनी एकाच दिवशी लागोपाठ दोन आंदोलने अनुभवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT