Anandacha Shidha sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : आनंदाचा शिधा वाटप नसल्याने 'दिवाळी कडू' ! पोहे, साखर नसल्याने वितरण लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा आणि नरडाणा गुदाममध्ये दिवाळीचा शिधा वाटप करण्यात आला आहे.

मात्र शिंदखेडा येथील धान्य गुदमात पोहे नसल्याने ६९ धान्य दुकानात दिवाळीचा शिधा वाटप रखडले असून अंत्योदय योजनेची साखर नसल्याने उपलब्ध झालेली नसल्याने लाभार्थ्यांची दिवाळी कडू होण्याची शक्यता आहे. (Due to lack of ration delay in anandacha shida distribution dhule news)

राज्यातील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक यांना आंनदाचा शिधा या संचात एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो रवा, हरभराडाळ, मैदा व पोहे असा शिधा १०० रूपयांमध्ये दिला जात आहे.

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील शासकीय धान्य गोडाऊनला ५६ स्वस्त धान्य दुकानदार, नरडाणा धान्य गोडाऊनला ५७ दुकानदार व शिंदखेडा येथील ६९ धान्य दुकानदार जोडण्यात आले आहेत. दोंडाईचा व नरडाणा गुदममध्ये दिवाळीचा शिधा वाटप करण्यात येत आहे.

शिंदखेडा येथील शासकीय धान्य गोडाऊन येथे पोहेचे १९ हजार ३९१ किट लागणार आहेत पण पोहेच उपलब्ध नसल्याने दिवाळी शिधा वाटपला विलंब होत आहे. त्यामुळे वेळेवर लाभार्थ्यांना शिधा मिळणार नसल्याने त्यांची दिवाळी यंदा कडू होण्याची शक्यता आहे.

" राज्य शासनाकडून दिवाळी शिधा वाटप करण्यात येतो. शिंदखेडा येथील गुदाम येथे पोहे नसल्याने वाटप करता येत नाही. शुक्रवारी शिंदखेडा येथील गुदाममध्ये पोहे उपलब्ध होणार असून लगेच स्वस्त धान्य दुकानदारांना वाटप करण्यात येईल.''- महेश शेलार, जिल्हा पुरवठा अधिकारी, शिंदखेडा धान्य गोडाऊन

शिधामधील वस्तु प्राप्त संच

तेल १९३९१

साखर १९४१०

चणाडाळ १९३९१

रवा १९४००

मैदा १४१०६

पोहे ०००००

पिशवी १९३९१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

Marathi Bhasha Vijay Melava : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात...

Asaduddin Owaisi: ओवेसींच्या एमआयएमने बिहार महाआघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त

SCROLL FOR NEXT