Dumper And Bus Accident On The Vinchur Prakasha Highway
Dumper And Bus Accident On The Vinchur Prakasha Highway 
उत्तर महाराष्ट्र

विंचूर प्रकाशा महामार्गावर वाळु डंपरची बसला टक्कर

सकाळवृत्तसेवा

अंबासन - ताहाराबाद (ता. बागलाण) येथील विंचूर प्रकाशा महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ सुसाट वेगाने धावणाऱ्या वाळु डंपरने नंदुरबार-नाशिक (क्र.एम.एच.२० बीएल २३१०) बसला कट मारल्याने अपघात घडला. वाळू डंपरचालकाने डंपर घेऊन पोबारा केला होता. स्थानिक तरूणांनी पाठलाग करून पिंपळनेर (ता. साक्री) हद्दीत पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, विंचूर प्रकाशा महामार्गावर दुपारी साडे बाराच्या सुमारास नंदुरबार नाशिक ही बस नाशिककडे प्रवाशी घेऊन जात होती. ताहाराबाद नजीक असलेल्या पेट्रोल पंपाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने बसला कट मारल्याने बाजूलाच असलेल्या खड्ड्यात बस जाऊन आदळली. यामुळे अकरा प्रवासी जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून डंपरचालकाने डंपर घेऊन पोबारा केला होता. स्थानिक तरूणांनी पाठलाग करून धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर हद्दीत डंपर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

जखमी झालेल्या प्रवाशांना ताहाराबाद येथील प्राथमिक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही प्रवाशांना जास्त दुखापतीमुळे मालेगाव येथील सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही. अपघात झाला त्या ठिकाणी जवळ मोठे झाड होते. ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी पुढेच मोठे झाड होते. मात्र पावसामुळे जमीन ओली असल्याने खड्ड्यातच बसचे टायर रूतल्याने पुढील मोठा अनर्थ टळल्याचे प्रवाशांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. सटाणा आघाराकडून त्वरीत दखल घेत आधिकारी व कर्मचा-यांनी घटनास्थळी दाखल होऊन जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ मदत म्हणून प्रत्येकी पाचशे रूपये देण्यात आले. जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश गावित याच्या मार्गदर्शनाखाली बापू फंगाळ, डी.के.गायकवाड, आर.डी.वाघ, एस.आय.गवळी यांनी पंचनामा केला.

जखमीची नावे - 

१)  जागृती संतोष भदाणे, वय २७, (पिंपळनेर ता. साक्री),

२) संतोष अशोक भदाणे, वय ३५, (पिंपळनेर ता. साक्री)

३) गुलाबराव एकनाथ पाटिल, वय ६८, (बल्हाणे ता. साक्री)

४) शैला दिलीप पाटिल, वय ६०, ( ता. साक्री)

५)  दिलीप मोतीराम पाटिल, वय ६३, (ता. साक्री)

६) छाया संदिप साळुंखे, वय २७, (ता. साक्री)

७) गुरूदास बाबुराव ठाकरे, वय २३, (नवापाडा, ता. साक्री)

८) सुमनबाई साहेबराव आहिरे, वय ५५, ( चिंचखेड ता. साक्री)

९) शोभाबाई भिका आहिरे, वय ५२, (चिंचखेड ता. साक्री)

१०) संगिता महेंद्र चौधरी, वय ४०, (नाशिक)

११) संगिता पोपट बत्तिसे, वय ४६, (सटाणा)

अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे डंपर आजही या रस्त्यावर धावत असल्याची चर्चा जोरात रंगली आहे. महसूल विभागाने कठोर पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. डंपरने वाळू नाशिक जिल्ह्याकडे पोहोच केली जात आहे. या डंपरचालकांची मुजोरी एकढी वाढली की वाळूने ओहरलोढ भरलेले डंपर भरधाव चालविताना दिसून येतात. मागील किंवा पुढे येणाऱ्या वाहनाला पास होण्यासाठी रस्त्यांवरून बाजूलाही हटत नाहीत परिणामी अपघाताला सामोरे जावे लागते. या अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT