उत्तर महाराष्ट्र

चक्क..पाकलकांनी भरले शाळेचे वीजबिल 

विनायक सुर्यंवशी

नवापूर  : वीजबिलामुळे शाळेचा वीजपुरवठा खंडित होणार आहे, अशी माहिती मिळताच पालक सहकार्यासाठी धावून आले. आमलान (ता. नवापूर) येथील जिल्हा परिषद शाळेचे थकीत पाच हजारांचे वीजबिल पालक व ग्रामस्थांनी वर्गणीतून भरले. 

आवश्य वाचा- शिक्षकांमध्ये समाधान..डिसीपीएस धारकांचा हिशेब देण्यास सुरूवात

आमलान (ता. नवापूर) येथील जिल्हा परिषद शाळेचे १४ महिन्यांचे वीजबिल न भरल्याने शाळेचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आले होते. शाळेचा वीजपुरवठा खंडित करू नये, अशी विनंती उपस्थित वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना केली. त्यांनी मुख्याध्यापकांची विनंती लक्षात घेत वीजपुरवठा काही कालावधीसाठी सुरू ठेवला. 
वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी मुख्याध्यापक बाळकिसन ठोंबरे व उपशिक्षिका अलका पाडवी यांनी क्षणाचाही विलंब न करता पालकांसह ग्रामस्थांची बैठक घेतली.

नियमांचे पालन करून सभा

फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर व कोरोना नियमांचे पालन करून शाळा व्यवस्थापन समिती व पालकांची सभा घेतली. वीजबिलाबद्दल माहिती दिली. पालकांना शाळेत असलेले डिजिटल साहित्य व त्यासाठी वीजपुरवठा किती महत्त्वाचा आहे, हे समजावून सांगितले. हा विषय समजून घेत पालकांनी आम्ही वर्गणी करून वीजबिल भरणार असल्याचे सांगितले. तत्काळ पुढाकार घेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र वसावे, धीरू वसावे, विजय गावित, कृष्णा वसावे, गोविंद वसावे, लता वसावे, राजू वसावे, दिलीप वसावे व सुरेश वसावे यांनी पालकांकडून वर्गणी जमा केली.

चाळीस हजार वर्गणी जमली

जमलेल्या वर्गणीतून पाच हजार ४० रुपये वीजबिल भरण्यात आले. यापुढे पालकांचे गट करून प्रत्येक महिन्याला वीजबिल भरणार असल्याचे ठरविले. या निर्णयाबद्दल मुख्याध्यापक बालकिसन ठोंबरे व उपशिक्षिका अलका पाडवी यांनी पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे आभार मानले. या उपक्रमाचे केंद्रप्रमुख कदमबांडे, विस्ताराधिकारी रेखा पवार व गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे यांनी कौतुक केले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT