trees plantation esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Municipality News : एंक्रोचमेंट हॉटस्पॉट ते इकॉलॉजिकल हॉटस्पॉट मोहीम

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : गेले दोन दिवस नगर पालिकेने मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण मोहीम राबवून रस्ते मोकळे केले. त्या अतिक्रमित जागेवर पालिकेतर्फे १ ते १५ मे पर्यंत ॲक्रोचमेंट हॉटस्पॉट ते इकॉलॉजिकल हॉटस्पॉट मोहीम राबवून वृक्षारोपण करून गार्डनिंग करणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी पुलकित सिंह यांनी दिली आहे. (encroachment Hotspot to Ecological Hotspot Campaign by Municipalities on Encroached Areas nandurbar news)

गेल्या अनेक वर्षापासून शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण करणाऱ्यांचा समस्यांनी नंदनगरीवासी हैराण झाले होते. स्थानिक राजकारणाचा विचार करीत ना सत्ताधारी त्यावर बोलत होते ना विरोधक आवाज उठवीत होते.

त्यामुळे अतिक्रमण दिवसागणिक वाढत होते. मात्र हातावर पोट भरणारा एखादा हातगाडीवाला एखाद्या दुकानासमोर अथवा रस्त्याच्या बाजूला हातगाडी लावून व्यवसाय करीत असतील तर ते लवकर प्रशासनाला व राजकीय लागेबांधे असलेल्या व्यक्तींना दिसत होते. आतापर्यंत त्यांच्यावरच रहदारीस अडथळा निर्माण केला म्हणून पोलिस विभागही कारवाई करताना दिसले.

मात्र खरे धनदांडगे व राजकीय लागेबांधे असलेल्या अनेकांनी दिसेल तेथे शासकीय जागेवर अतिक्रमणाचा विळखा घातला. एवढेच काय तेथे दुकाने तयार करून भाडे तत्त्वावरही दिले जात असल्याची चर्चा होती. याबाबत प्रशासकाकडे काही नागरिकांनी तक्रार केल्यानंतर मुख्याधिकारी पुलकित सिंह यांनी २८ व २९ एप्रिल असे दोन दिवस अतिक्रमण मोहिमेची धडाकेबाज कारवाई केली. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील टपऱ्या -कच्चे अतिक्रमणे आदी काढले गेले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

१ मेपासून मोहीम

अतिक्रमण मोहीम पुढेही अशीच सुरू ठेवण्याचा मानस श्री. सिंह यांनी व्यक्त केला आहे. सध्या काढलेल्या अतिक्रमित जागा मोकळ्या झाल्या आहेत.

त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून पालिकेने मुख्याधिकारी पुलकित सिंह यांच्या संकल्पनेतून ॲक्रोचमेंट हॉटस्पॉट ते इकॉलॉजिकल हॉटस्पॉट मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोहीम १ ते १५ मे दरम्यान नंदुरबार शहरात राबविली जाणार असल्याचे सांगितले. तसेच पुन्हा नवीन अतिक्रमण करणाऱ्यांकडून दंड वसुल करण्याचे निर्देश दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! शैक्षणिक सहलींसाठी विद्यार्थ्यांसाठी सहलीत ५० टक्के सवलत; प्रत्येकास १० लाखांचा अपघात विमाही; एसटी महामंडळाचे आगारप्रमुख जाणार शाळांमध्ये

आजचे राशिभविष्य - 19 नोव्हेंबर 2025

Horoscope Prediction : आज तयार होतोय अमला राजयोग; मेष आणि या पाच राशींच्या आर्थिक अडचणींना लागणार पूर्णविराम !

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात रवा पिझ्झा बॉल ट्राय केले का? लगेच लिहून घ्या रेसिपी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT