potholes
potholes 
उत्तर महाराष्ट्र

मनमाड: पाणीटंचाईचे शहर बनतेय खड्ड्यांचे शहर 

अमोल खरे

मनमाड- शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने ते अत्यंत जीवघेणे झाले आहेत. खड्ड्यांमुळे अनेक अपघातही झाले आहेत, तर अनेकांना पाठीचे, मानेचे आजार जडले आहेत. रस्त्यांची समस्या अत्यंत गंभीर असताना लोकप्रतिनिधी, पालिका कोणालाच याचे गांभीर्य नाही. खड्डेमुक्त मनमाड हे केवळ मृगजळच मनमाडकरांसाठी झाले आहे. 

मनमाड शहर हे अगोदरच अनेक समस्यांनी ग्रासले आहे. शहरातील सर्वच रस्त्यांना पडलेले मोठमोठे खड्डे डोकेदुखी झाले आहेत. शहरातील कोणत्याही रस्त्याने जा खड्डे आहेतच. रस्त्यांची अगदी चाळण झाली असून, नागरिकांना रस्त्याने चालणे मुश्‍कील झाले आहे. हे खड्डे वाहतुकीला मोठे अडथळे ठरत आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. अनेकदा वाहन खड्ड्यात आदळल्याने अपघातही झाले आहेत. अनेक जण जखमी झाले आहेत. या शहरातील अनेकांना पाठीचे, मानेचे, मणक्‍याचे आजार जडले आहेत. अगदी रस्त्याने चालताना तोंडातून आपोआप शिव्याशाप येतात इतकी बिकट परिस्थिती या रस्त्यांची झाली आहे. 

रस्त्यांवर गाळ, चिखल साचल्याने गाड्या स्लिप होणे, अंगावर चिखल उडून कपडे घाण होणे हे नित्याचेच आहे. पाणीटंचाईचे शहर म्हणून मनमाड ओळखले जाते. त्याच्या जोडीला आता खड्ड्यांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. सण-उत्सव आला की पालिका या रस्त्यांवर केवळ माती, कच्चा मुरूम टाकून जुजबी मलमपट्टी करते. पाऊस आला की पुन्हा खड्डे डोके वर काढतात. कामे झालेल्या रस्त्यांचीही हीच अवस्था आहे. त्यावरही हातभर खड्डे पडले आहेत. ही कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. मात्र कोणीच बोलायला तयार नाही. नागरिकही केवळ कुजबूज करण्याशिवाय काहीच करत नाहीत. नव्याने केलेले रस्ते लगेच उखडतातच कसे? देखरेख ठेवणारा पालिकेचा संबंधित विभाग केवळ पाट्या टाकण्याचे काम करतो का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. याबाबत ना लोकप्रतिनिधी ना प्रशासन कोणालाच गांभीर्य नाही. आज शहरातील सर्वच रस्ते शेवटची घटका मोजत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT