A delegation of Dhule Sakal Maratha community visiting Maratha reservation issue Manoj Jarange-Patil in the hospital. esakal
उत्तर महाराष्ट्र

Manoj Jarange Patil News : जरांगे-पाटलांच्या सभेसाठी धुळ्यात समित्यांची स्थापना

सकाळ वृत्तसेवा

Manoj Jarange Patil News : मराठा-पाटील आरक्षणप्रश्‍नी लढा उभारणारे मनोज जरांगे-पाटील यांची येथे ३ डिसेंबरला जेल रोडवर जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी तयारी सुरू असून, बुधवारी विविध समित्यांची स्थापना झाली, तसेच नियोजनाला वेग देण्यात आल्याची माहिती सकल मराठा समाजाने दिली.(Establishment of Committees in Dhule for meeting of Jarange Patil dhule news)

श्री. जरांगे-पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील सभांना १ डिसेंबरपासून सुरवात होत आहे. त्यात येथील जेल रोडवर ३ डिसेंबरला दुपारी एकला सभा होणार आहे. त्यासाठी सभेचे नियोजन केले जात आहे. खानदेशातून सकल मराठा समाज उपस्थित राहील.

दरम्यान, श्री. जरांगे-पाटील यांची २६ नोव्हेंबरला छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात धुळे जिल्हा सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यांना धुळे शहरातील जाहीर सभेसाठी निमंत्रणपत्र दिले.

त्याचा स्वीकार करत श्री. जरांगे-पाटील यांनी सभेबाबत आश्‍वासन दिल्याची माहिती शिष्टमंडळातील भानुदास बगदे, सुधाकर बेंद्रे, विनोद जगताप, निंबा मराठे, दीपक रौंदळ, संदीप पाटोळे, गोविंद वाघ, हेमंत भडक, दिनेश काळे, संदीप सूर्यवंशी, कैलास मराठे, प्रेमचंद्र आहिराव, बाजीराव खैरनार, सुनील ठाणगे, बाळासाहेब ठोंबरे, वीरेंद्र मोरे, अण्णासाहेब कणसे, श्याम निरगुडे, देव पवार, प्रफुल्ल माने, देवेंद्र मराठे, भूषण बागूल, सुनील पाटील आदींनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT