crime
crime  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : तोतया अन्ननिरीक्षकांनी उकळली लाखांची खंडणी; दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर : अन्न व औषध विभागाकडून आल्याची बतावणी करून किराणा दुकानदाराकडून गुटखा जप्त करून एक लाखांची खंडणी भामट्यांनी उकळली. ते निघून गेल्यानंतर अस्सल अधिकाऱ्यांनी छापा टाकला.

त्यामुळे आधीची कारवाई बनावट असल्याचे उघड झाले. दोन भामट्यांना थाळनेर पोलिसांनी अटक केली. ही घटना १९ जानेवारीला सकाळी सहाला तरडी (ता. शिरपूर) येथे घडली. (Extortion of Lakhs by Fake Food Inspectors Both arrested dhule crime news)

याबाबत सचिन सुभाष पाटील (वय २३, रा. तरडी) याने थाळनेर पोलिसांत फिर्याद दिली. त्यांचे घरगुती स्वरूपाचे किराणा दुकान आहे. पहाटे सहाला त्यांच्या घराचे दार ठोठावून दोघांनी त्यांना उठविले.

‘आम्ही फूड अॅन्ड ड्रग्ज विभागाचे अधिकारी आहोत. आमचे साहेब मागे येत आहेत. तुमच्याकडे गुटखा आहे का,’ असे विचारून त्यांनी घराची झडती घेतली.

घरात ३० ते ३५ हजार रुपयांचा गुटखा सापडला. कारवाई टाळण्यासाठी संशयितांनी पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. पाटील यांनी तडजोडीपोटी एक लाख रुपये गोळा करून दिले. त्यानंतर संशयित पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसून निघून गेले.

काही वेळाने धुळे येथील अन्न व औषध विभागाचे अधिकारी किशोर बाविस्कर, कांबळे यांनी पाटील यांच्या दुकानावर छापा टाकून गुटखा जप्त केला.

त्यामुळे आपली फसवणूक करून एक लाखाची खंडणी घेतल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी संशयावरून दोघांना अटक केली.

संशयितांमध्ये राहुल शिवाजी देवकाते (वय ३५, रा. पंढरपूर, जि. सोलापूर), विनायक सुरेश चवरे (३५, रा. सोलापूर) यांचा समावेश असून, त्यांचा साथीदार लक्ष्मण ताडे फरारी आहे. संशयितांकडून क्रेटा कार (एमएच १६, एबी ०२५४) पोलिसांनी जप्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

SCROLL FOR NEXT