City police squad with seized fake liquor factory materials.
City police squad with seized fake liquor factory materials. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : बनावट दारुचा कारखाना उद्‌ध्वस्त

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरातील पांझरा नदीकाठी फुले नगरात सुरु असलेला बनावट दारुचा (Fake Liquor) कारखाना शहर पोलिसांनी उद्‌ध्वस्त (Demolished) केला. त्यात एक लाख किमतीची दारु आणि साहित्य जप्त (Seized) करण्यात आले आहे. (fake liquor factory material seized by police Dhule crime News)

या प्रकरणी बनावट दारुचा कारखाना चालविणाऱ्या पाच जणांसह ही दारु खरेदीसाठी आलेल्या गुजरातच्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली आहे. शहरातील मोगलाई भागामधील पाटकिनारी फुलेनगरात पत्र्याचे छत असलेल्या घरात अवैध दारु कारखाना सुरु असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळाली. शहर पोलिस पथकाने रात्री पावणेअकराच्या सुमारास छापा टाकला. स्पिरीटचे ड्रम तसेच विदेशी दारुच्या भरलेल्या व रिकाम्या बाटल्या, बूच, सील, पिंप, गाळणी, बनावट मद्य निर्मिती कामी लागणारे साहित्य, असा एक लाख सात हजार ७३० किमतीचा मुद्देमाल घटनास्थळी जप्त केला.

अवैध दारु कारखाना चालविणारे नंदाबाई संजय केदार (वय ५५), वैशाली रवींद्र वाघमारे, (वय ३०), रवींद्र वाघमारे, विशाल केदार, सागर उर्फ दादू पिंपळे (सर्व रा. फुलेनगर) तसेच विदेशी बनावटीची दारु खरेदीसाठी आलेले प्रदीपकुमार विराभाई पटेल, अनिता प्रदीपकुमार पटेल (दोघे रा. सुरत, गुजरात) यांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू होती. पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक ईश्‍वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचे निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक अध्यक्ष संतोष तिगोटे, उपनिरीक्षक दीपक घनोटे, दत्तात्रय उजे, भिकाजी पाटील, हवालदार विलास भामरे, सतीष कोठावदे, अविनाश पवार, प्रल्हाद वाघ, कुंदन पटाईत, नीलेश पोतदार, मनीष सोनगिरे, प्रवीण पाटील, अविनाश कराड, विवेक साळुंखे, शाकीर शेख, सुशीला वळवी, किरण भदाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प; CSMT स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला

SCROLL FOR NEXT