Bipin Kasar making copper urns esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : अयोध्येत श्रीराम प्रभूचरणी सोनगीरचे तांब्याचे कलश

सोनगीर येथील प्रसिद्ध तांब्याची भांडी व तयार करणाऱ्या कारागिरांचे नावलौकिक भारतभर होणार असून येथून तांब्याची २०० कलश अयोध्याला नेण्यात आली असून प्रभू श्रीरामचंद्रच्या मंदिरात ठेवण्यात येतील.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथील प्रसिद्ध तांब्याची भांडी व तयार करणाऱ्या कारागिरांचे नावलौकिक भारतभर होणार असून येथून तांब्याची २०० कलश अयोध्याला नेण्यात आली असून प्रभू श्रीरामचंद्रच्या मंदिरात ठेवण्यात येतील.

त्यामुळे गावाच्या नावाची ख्याती पसरणार आहे. (famous copper kalash from Songir taken to Ayodhya and will kept in temple of Lord Sri Ram)

सोनगीर हे तांबे व पितळापासून भांडी बनवणे व विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. राज्यातील बहुतांश व्यापारीपेठेत येथील भांडी आकर्षणाचे केंद्र आहेत. परदेशातही भांडी पोचली आहेत. सध्या देशवासीयांचे डोळे राममंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे लागले आहेत.

देशभरातून हजारो भाविक अयोध्या पोहचत आहेत. देशभरातील प्रसिद्ध वस्तूही अयोध्येला श्रीरामाच्या चरणी पोहचत आहेत. त्यात पितळी घंटा, लाकडे, समिधा, घी, खाण्या-पिण्याची भांडी, उंचीवस्त्रे, अन्न धान्य, विविध प्रसिद्ध वस्तू आदींचा समावेश आहे.

येथील तांब्याचे २०० कलश (कळशी) राममंदिरात पोहचत असल्याने गावासाठी अभिमानाची बाब आहे. अनेक धुळेकरांचे श्रद्धास्थान असलेले एक परमपूज्य स्वामी श्रीगोविंददेव गिरी महाराज (कोषाध्यक्ष, राम मंदिर अयोध्या).

काशी येथील गणेश्वर शास्त्री द्रविड, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित, केशव गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल केले यांनी येथील बिपिन कासार व गावातील काही कारागिरांनी बनवलेले पुजेसाठी लागणारे तांब्याचे कलश येथील व्यापारी उदय चंपालाल कासार यांचेकडून घेतले.

त्यांची तीन जानेवारीला धुळ्यात मिरवणूक व पूजन केल्यानंतर नुकतेच ते अयोध्याला पोचवण्यात आले. याशिवाय अजून काही कलश अयोध्याला नेले जाणार असून त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बिपिन कासार हेच ते कलश बनवित आहेत.

तांब्याचे कलश अयोध्याला पोचल्याचा आनंद असून आमच्या कामाचे खऱ्या अर्थाने चीज झाले. आम्ही सध्यातरी अयोध्याला जाऊ शकत नसलो तरी आमचे कलश म्हणजेच आमचे हात प्रभूचरणी पोचतील. आम्ही धन्य झालो... बिपिन कासार सांगत होते.

ते म्हणाले येथील कारागीर मंदिरावरील कळस बनविण्यासाठी प्रसिद्ध असून हजारो मंदिर येथील कळसाने सुशोभित झाले आहेत. देवासाठी काहीतरी कामात येतो आणि या माध्यमातून परमेश्वराची सेवा होते हेच आमचे भाग्य व पुण्य आहे असे मला वाटते.

गावोगावी विविध उत्सवप्रसंगी महिलावर्ग डोक्यावर कळशी घेऊन मिरवणुकीत सहभागी होतात. म्हणूनच कळशीला सर्वाधिक मागणी असते. असे प्रसिद्ध व्यापारी रमेश पंडित कासार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT