उत्तर महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; चिमठाणे परिसरातील शेतकऱ्यांना कांदा व्यापाऱ्याने लावला कोटीचा 'चुना '

विजयसिंग गिरासे

चिमठाणे : दराणे (ता.शिंदखेडा) येथील ' पिंजारी ' नामक स्व:ताला कांदयांचा व्यापारी समजणारयांने चिमठाणे, दलवाडे (प्र.सोनगीर),तामथरे, रोहाणे , बोरीस (ता.धुळे) आदी गावातील शेतकरयांचा शेकडो किंव्वटल कांदयांचे कोटी रुपयाला चुना लावला आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डाॅ. प्रताप दिघावकर यांनी शेतरयांना न्याय मिळवून द्यावा अशी शेतकरयांनी विनंती केली आहे. 

दराणे येथील घरदार नसलेल्या ' पिंजारी ' नामक कांदा व्यापारी यांने चिमठाणे परिसरातील कांदा उत्पादक शेतकरयांना घेरले .आॅगस्ट - सप्टेंबर महिन्यात रब्बी कांदयांचा प्रती किंव्वटल भाव 500 ते 650 होता. माञ या महाभाग व्यापारी यांने शेतकरयांना 750 प्रती किंव्वटल भाव देवून शेतकरयांना ' भुरळ ' घातली आणि उधारीने कांदा खरेदी सुरू केली. यातच ' शेतकरी राजा ' मोहाला बळी पडला आणि तेथेच शेतकरयांची फसवणूक झाली.

'त्या ' व्यापारयांचा मुक्काम ढाब्यावर! 
तथाकथीत कांदा व्यापारीचा मुक्काम सोनगीर - दोंडाईचा राज्य महामार्गावरील दराणे (ता.शिंदखेडा) फाटयाजवळ असलेल्या एका ढाब्यावर होता. शेतकरयांनी तरी ' त्या ' व्यापारीला कांदा विकला होता. आता शेतकरी ' त्या ' ढाब्यावर तपास करण्यासाठी जातात तर ढाबा मालक म्हणतात की , तो आम्हालाही ' चुना ' लावून गेला आहे. 

27 शेतकरयांना कांदा ने डोळ्यात आणले पानी !
.चिमठाणे, दलवाडे(प्र.नंदुरबार), तामथरे, बोरीस व रोहाणे येथील 27 शेतकरयांचे एक हजार 350 किंव्वटल कांदयांचे सुमारे एक कोटी रूपयाला चुना लावला आहे. शेतकरयांनी ' त्या ' व्यापारयाचा शोध घेतला पण मिळून आला नाही. मोबाईल ही बंद आहे. 


" दराणे येथील पिंजारी नामक कांदा व्यापारी याला मी सप्टेंबर महिन्यात 50 किंव्वटल रब्बी कांदा 700 रूपये किंव्वटल दराने विकला होता. त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. 
गोकुळ हनुमंत पाटील, शेतकरी. चिमठाणे, ता.शिंदखेडा. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT