उत्तर महाराष्ट्र

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खुल्या निर्यातीचा मिळणार लाभ; तो कसा ? वाचा सविस्तर !

निखील सुर्यवंशी

धुळे ः केंद्र सरकारने १ जानेवारीपासून कांद्यावरील निर्यातबंदी उठविली आहे. या निर्णयाचा साक्री तालुक्याच्या पदरात अधिक लाभ पडेल. पाठोपाठ धुळे, शिंदखेडा तालुक्याला सर्वसाधारण लाभ होऊ शकेल. निर्यात खुली झाल्याने कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी तीन हजार रुपयांहून अधिक लाभ मिळावा, अशी अपेक्षा येथील उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 

केंद्राने कांदा निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांसह राजकीय नेत्यांनी रान उठविले होते. खुद्द भाजपचे अनेक खासदार मोदी सरकारवर नाराज होते. शेतकऱ्यांची या निर्णयामुळे कोंडी तर झालीच शिवाय त्यांना चांगला दर मिळण्याची अपेक्षा असतानाच निर्यातबंदीमुळे उत्पादनासह आर्थिक नुकसान सोसावे लागले. रांगडा कांदा तर खराबही झाला. 

कांद्याची अशी निर्यात 
जिल्ह्यात कांद्याचे सर्वाधिक पीक साक्री तालुक्यात घेतले जाते. नंतर धुळे, शिंदखेडा तालुक्यांत सर्वसाधारण प्रमाणात कांदा घेतला जातो. शिरपूर तालुक्यात फारसा कांदा घेतला जात नाही. येथील कांद्याची प्रत चांगली असल्याने अमृतसर, दिल्ली, राजस्थान, मलेशियापर्यंत कांद्याची निर्यात झाली आहे. विदेशात कांदा निर्यात होण्यासाठी येथील शेतकरी राज्यात प्रसिद्ध लासलगाव (जि. नाशिक) येथील व्यापाऱ्यांना कांदा पुरवितात. 

...तर शेतकऱ्यांचा लाभ 
खरिपातील कांद्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. यात निर्यातबंदीमुळे अधिकच आर्थिक फटका सोसावा लागला. कोरोना संकटकाळामुळे कांदा व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले. आता निर्यातबंदी उठल्याने चलनवलन वाढीस लागेल, शेतकऱ्यांचा लाभ होऊ शकेल. कांद्याची निर्यात वाढली तर भाववाढ होईल. ती शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल. निर्यातबंदीबाबत सरकारचे धोरण चुकीचेच आहे. आयात- निर्यातीबाबत धोरण कायम निश्‍चित असले पाहिजे, असे पढावद येथील कृषिभूषण ॲड. प्रकाश पाटील, धुळे येथील कांदा व्यापारी विनोद सोमनाथ चौधरी यांनी सांगितले. 
 

भाववाढीची मागणी 
निर्यात खुली झाल्याने आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल सरासरी तीन हजार रुपयांहून अधिक भाव मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त झाली. सद्यःस्थितीत बाजार समितीत कांद्याचा प्रतिक्विंटल भाव २,२०० ते २,३०० रुपये आहे. शेतकऱ्यांनी कांद्याची नवीन लागवड केल्याने त्यांना निर्यात खुली होण्याचा लाभ होऊ शकेल. चवीमुळे आपल्या कांद्याला विदेशात चांगली मागणी असल्याचे ॲड. पाटील, श्री. चौधरी यांनी सांगितले. 

धुळे जिल्ह्यात कांदालागवड 
- खरीप : ५५७ हेक्टरवर 
- रब्बी : १५,९५५ हेक्टरवर  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

Simple Footpath Wedding: अमरावतीत उड्डाणपुलाखाली फुटपाथवर रंगला साधेपणाचा अनोखा विवाहसोहळा; सोशल मीडियावर कौतुकाची लाट

Successful National Lok Adalat: गंगापूर जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी; १०७ प्रकरणांचा तडजोडीने निपटारा, ८० लाख रुपयांची वसुली

SCROLL FOR NEXT