उत्तर महाराष्ट्र

भावच मिळत नाही; मग काय हृदयावर दगड ठेवून शेतकऱ्याने फिरविला रोटाव्हेटर  

जगन्नाथ पाटील

कापडणे : शेतकरी, शेती उत्पादन आणि नुकसान एके नुकसान हे जणू पाचवीलाच पुजलेले आहे. दोन पैसे अधिकचे येतील, असे वाटू लागत असतानाच भाव पडतात अन्‌ नुकसान स्वीकारण्याशिवाय पर्याय राहात नाही. सध्याही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

या वर्षी अधिक आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पाण्याचे सर्वच स्रोत तुडुंब भरून आहेत. यामुळे धुळे तालुक्यात भाजीपाला उत्पादनात कमालीची वाढ झाली आहे. मुळा, कोथिंबीर आणि मेथीचे रेकॉड ब्रेक उत्पादन होत आहे. परिणामी, मुळा अवघा प्रतिकिलो दोन ते तीन रुपयांनी विक्री होत आहे. 

भाव मिळत नाही

धुळे तालुक्यातील मुळा उत्पादक शेतकरी हृदयावर दगड ठेवून मुळा शेतीवर रोटाव्हेटर फिरवित आहेत. भाव नसल्याने मुळा फेकण्याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

मुळा शेतीत मेंढपाळांचा वाडा 
मुळा काढणीचा खर्च निघणेही मुश्कील झाले आहे. आता मुळा उत्पादक मुळ्याच्या शेतीत मेंढ्यांचा वाडा बसविण्यास प्राधान्य देत आहेत. त्यानंतर रोटाव्हेटर फिरवून शेती तयार करीत आहेत. त्या शेतात गहू पेरणीस शेतकरी प्राधान्य देत आहेत. 

तालुक्यातील कापडणे, धनूर, देवभाने, वडेल, नंदाणे, बोरीस, लामकानी, नेर, कुसुंबा, खेडे, मुकटी, अजंग येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घेतात; पण हे उत्पादन शेतकऱ्याला परवडत नाही. 
-किशोर बोरसे, मुळा उत्पादक शेतकरी, कापडणे  

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT