उत्तर महाराष्ट्र

सिंचनासाठी पाण्याचे आत्ताच नियोजन करा ! 

सदाशिव भालकार

दोंडाईचा  : मालपूर (ता. शिंदखेडा) येथील अमरावती मध्यम प्रकल्पात यंदाही पूर्णक्षमतेने जलसाठा झालेला होता. यंदाच्या रब्बी हंगामात केवळ ५७३ हेक्टर जमिन सिंचनाखाली आली. दरम्यान रब्बीसाठी चार आवर्तने तर उन्हाळी पीकास एक आवर्तन पाणी सोडले गेले आहे. यंदा झपाट्याने जलसाठा घटत असल्याने आता साठ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पाण्याचा वापर काटकसरीने करत शेताच्या बांधापर्यंत पाणी जाण्याचे नियोजन संबंधित विभागाने करावे. शेतचाऱ्यांची बांधकामे व जलनि:स्सारण अनुषंगिक कामे हाती घ्यावे. यासाठी आतापासूनच उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 


शिंदखेडा तालुक्यातील मालपूर, खर्दे, मांडळ, चुडाणे सुराय, दोंडाईचा, रामी या सहा गावांतील शेतीस सिंचनाचा फायदा होणार आहे. यातुन २६०६ हेक्टर जमिन ओलिताखाली येणार असल्याचे नियोजन आहे. दरम्यान यंदाच्या रब्बी हंगामात कालव्यांतून, विहिरी क्षेत्र यातुन ५७३ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. २६०६ हेक्टर जमिन सिंचनाखाली येत नाही तोपर्यंत शेती सुजलाम् सुफलाम् होण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. निर्धारित क्षेत्र सिंचनाखाली येण्यासाठी पुढील नियोजन संबंधित विभागाने आत्तापासूनच करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 


अमरावती धरणाचे काम सन १९७९ पासून सुरू झाले होते. तर २००६ साली पूर्ण झाले. तेव्हाच धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यातून ९०० हेक्टर क्षेत्रात सिंचन झाल्याच्या नोंदी संबंधित विभागाकडे आहेत. त्यानंतर तब्बल १२ वर्षात पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला नसल्याने धरण कोरडेठाक होते. २०१९ च्या पावसाळ्यात धरणात पूर्ण जलसाठा झाला. काही पाण्याचा नदी पात्रात विसर्ग करावा लागला होता. दोन्ही कालव्यांचे सक्षमीकरण नसल्याने पाणी सैरावैरा वाहिले. गेल्या पावसाळ्यात पुन्हा दुसऱ्यांदा निसर्गाच्या कृपेने धरण पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे किमान ५०% जमिन सिंचनाखाली येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु ती फोल ठरली आहे. येणाऱ्या काळात धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून संपूर्ण क्षेत्र सिंचनाखाली येण्यासाठी अजून किती वर्षे वाट पाहावी लागेल, असा प्रश्‍न शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. 


नेमके पाणी मुरले कुठे? 
यंदाच्या रब्बी हंगामासाठी चार वेळा कालव्यातुन पाणी सोडले गेले. यातुन मालपूर, सुराय, मांडळ, चुडाणे येथील शेतकऱ्यांना त्या पाण्याचा लाभ मिळाला. आजघडीला अमरावती धरणातून ४० टक्केपर्यंत जलसाठा झपाट्याने खाली गेला असल्याचे संबंधित विभागाकडून सांगितले जाते. तुलनेने सिंचन क्षेत्र कमी झाले. नेमके पाणी कुठे मुरले हा प्रश्न या निमित्ताने शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. गेल्या दहा पंधरा वर्षांच्या काळात शेतकऱ्यांनी दुष्काळाचे अनेक चटके सहन केले आहेत. त्यामुळे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे किंमत असायला हवी. तब्बल चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर दोन वर्षांपासून पाणी पहायला मिळाले आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काय ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT