farmer suiside.jpg 
उत्तर महाराष्ट्र

या विवंचनेतून केली शेतक-याने आत्महत्या

दिपक खैरनार : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बागलाण तालुक्यातील वायगाव येथील शेतक-याची मालेगावच्या सीमेवरील कोठरे शिवारात शेतजमीन असून कर्जबाजारीपणा व परतीच्या पावसामुळे विवेंचनात सापडलेल्या अल्पभुधारक शेतक-याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. 

कर्जबाजरीपणा व परतीच्या पावसाने नुकसान

केदा मोठाभाऊ देवरे असे आत्महत्याग्रस्त  शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्यावर बँकेचे साडेतीन लाखांचे कर्ज होते. शिवाय घरातील सोने देखील गहाण होते. परतीच्या पावसाने डाळिंबाच्या झाडावरील बहरलेली फुलही गळून पडली तसेच कांदा पिकाचे देखील नुकसान झाले. आता याचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून या शेतक-याने आत्महत्या केल्याची घटना घडली. वडनेर पोलिसांतर्फे  शेतक-याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मालेगावच्या सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. देवरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुन व नातवंड आहेत.

वायगाव (ता.बागलाण) येथील रहिवासी व कोठरे बु. येथील शेतकरी खातेदार केदा मोठाभाऊ देवरे यांनी (ता.३१) सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास कोठरे बु येथील गट क्र. १०५/१ (क)  मधील स्वतःच्या विहिरीत आत्महत्या केली हा प्राथमिक अहवाल तहसीलदार चंद्रजीत राजपुत यांनी सादर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पहिली भेट पोलीस भरतीत, नंतर एकाच ठिकाणी पोस्टिंग अन् वाढली जवळीक; आता पुण्यातील दोन महिला पोलीस करणार लग्न

Pune Katraj Ghat: कात्रज घाटात भाजपचे प्रचार साहित्य कचऱ्यात; झेंडे, टोप्या आणि मोदींच्या फोटोचे टीशर्ट आढळल्याने खळबळ

Wheat Flour Export: भारतीय गव्हाचे पीठ आता परदेशात जाणार! ४ वर्षांची निर्यातबंदी अखेर हटवली; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Marathi News Live Updates : क्षुल्लक माणसे माझ्या प्रसिद्धीचा आधार घेऊ शकत नाहीत - कंगना रणौत

Phulambri News: आमदार होताच पहिल्याच निवेदनात मोठी मागणी; फुलंब्रीत छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार?

SCROLL FOR NEXT