उत्तर महाराष्ट्र

शेतकऱ्यांची पैशासाठी बागायतदार नातेवाईकांवर मदार

संतोष विंचू

येवला - यंदाचा दुष्काळ शेतकऱ्यांना पैशाची नव्हे तर अन्नधान्य आणि पाण्याची टंचाई भेडसावणारा ठरत आहे. पावसाभावी खरिपाची पिके निघाली नसल्याने रब्बीचा तर विषयच उरला नाही. थोड्याफार प्रमाणात पाणी असलेल्या शेतकऱ्यांनीही उन्हाळ कांद्याला प्राधान्य दिल्याने तालुक्यात यंदा गव्हाची प्रचंड टंचाई जाणवणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेजारील तालुक्यातील आपल्या बागायतदार नातेवाइकांवर मदार ठेवली आहे. तर अनेकांनी आत्ताच रेशन दुकानांसह बाजारातून गहू खरेदीला प्राधान्य दिले आहे.

भौगोलिक विषमतेमुळे आवर्षणप्रवण दुष्काळी तालुक्यात यंदा रब्बीचे चित्र विदारक बनले आहे. तालुक्यातील शेतकरी कांदा,मका,कपाशीचे उत्पन्न घेत असले तरी पीक म्हणूनच नव्हे तर घरगुती वापरासाठी सुमारे पाच हजार ५००  हेक्टरवर दरवर्षी गव्हाची पेरणी करतात. यावर्षी पावसाळ्यातील खरिपाची पिकेच निघाली नसल्याने रब्बीचा विषयी अर्ध्यावर तालुक्यात नव्हताच. ज्यांना पालखेडचे पाणी मिळाले अशांसह थोडेफार पाणी असलेल्या शेतकऱ्यांनी यंदा दोन पैसे मिळण्याच्या आशेने पुन्हा कांद्यासह ज्वारीचे पीक घेतले आहे. परिणामी अवघ्या एक हजार १७८ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली असून यातील निम्मे अधिक क्षेत्रातील गहू पाणी आटल्याने आताच धोक्यात सापडला आहे.

या सगळ्या स्थितीत बाजारात शेकडो पोते गहू विकणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा शेतामध्ये पायली भर गव्हाचे पीक देखील परागंदा झाले आहे. त्यामुळे घरगुती गरज भागविण्यासाठी बागायतदार म्हटले जाणारे शेतकरी ही बाजारातून तसेच काही जण रेशन दुकानातून विकत घेऊन खात आहेत. अनेकांनी निफाड, कोपरगाव, दिंडोरी आदि तालुक्यातील आपल्या नातेवाइकांकडून गहू मिळवण्याचा पर्याय शोधला आहे.

हजारो हेक्टर शेती पडली ओस..
पावसाळा तालुक्यासाठी उन्हाळाच होता..आता हिवाळा संपत आला असून सोबतच दाहकता जटील बनली आहे.  इतके दिवस जे तोडकेमोडके पिक निघाले त्यावर शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी केली अन आता पोटाला चिमटा घेत उदरनिर्वाह चालवला आहे. आज तर हजार एकरांवर जमीन पिकांअभावी ओसाड पडली असून जिकडे पहावे तिकडे सताड मोकळे झालेले आकाश शेतातून दिसतेय. अनेकांनी बैल, ट्रक्टरद्वारे नागरणी करून ठेवल्याने ढेकळांशिवाय काहीही नजरेत पडत नसल्याचे चित्र आहे.पालखेडच्या लाभक्षेत्रात थोडेफार हिरवे रान दिसतेय पण तेही क्षणभंगुर असून उन्हाळ कांदे,ज्वारी आत्ताच करपू लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: ...तर पेट्रोलचे दर 20 रुपयांनी वाढले असते; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य चर्चेत

RTE Maharashtra: पालकांना मोठा दिलासा! RTE च्या सुधारणेला हायकोर्टाची स्थगिती; नवे नियम तुर्तास होणार नाहीत लागू

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Share Market Closing: शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा; मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT