Dr. Heena Gavit, Amrishbhai Patel, Kashiram Pawra esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crop Insurance : लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्या‍ना पीकविम्याचा लाभ

शासनाच्या एक रुपयात पीकविमा योजनेसह केळी व पपई यांचा फळपीक विमा घेतलेल्या साडेसात हजार शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या हानीपोटी विमा मंजूर करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर : शासनाच्या एक रुपयात पीकविमा योजनेसह केळी व पपई यांचा फळपीक विमा घेतलेल्या साडेसात हजार शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या हानीपोटी विमा मंजूर करण्यात आला असून, त्यांच्या खात्यावर रकमाही जमा झाल्या आहेत. (Farmers benefit from crop insurance due to follow up by public representatives dhule news )

याकामी खासदार डॉ. हीना गावित, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी शासनासह विमा कंपन्यांकडे पाठपुरावा केला होता.

शासनाच्या एक रुपयात विमा योजनेबाबत शासकीय स्तरावरून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. त्यात लोकप्रतिनिधींनीही वेळोवेळी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संवाद साधून पीकविमा घेण्याचे आवाहन केले होते. खासदार गावित यांची संपर्क यंत्रणा.

आमदार पटेल यांच्या विकास योजना आपल्या दारी अभियानाच्या यंत्रणेसह डॉ. तुषार रंधे यांच्या कार्यकर्त्यांनी दुर्गम आदिवासी भागातदेखील या योजनेबाबत व्यापक प्रचार केला होता.

त्यामुळे या योजनेला उदंड प्रतिसाद मिळून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला होता. त्यासोबतच फळपीक विमाधारकांनीही व्यापक संख्येने विमा घेतला होता.

अवकाळी पाऊस, वादळ, गारपीट यामुळे झालेल्या हानीनंतर विमा कंपनी व विमाधारक शेतकरी यांच्यादरम्यान उद्‌भवलेल्या विवादाचे निराकरण करण्याकामी कार्यकर्त्यांमार्फत लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला.

खासदार डॉ. हीना गावित यांनी कृषी राज्यमंत्री शोभा करंडलांजे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. ज्या निकषांआधारे विमा नाकारण्याचा प्रयत्न झाला, त्यांचे पुनर्विलोकन करण्यासाठी शासनाकडे व विमा कंपन्यांकडे लोकप्रतिनिधींनी अथक पाठपुरावा केला.

त्यामुळे सात हजार ४४५ शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा करण्यात आली आहे. पुनर्रचित हवामान आधारित केळी पीकविमा योजनेंतर्गत शिरपूर, बोराडी, अर्थे, जवखेडे, होळनांथे, थाळनेर, सांगवी या सात महसूल मंडळांमध्ये १७ कोटी ४२ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर करण्यात आला आहे.

लाभ मिळवून देण्यास सहकार्य केल्याबद्दल लोकप्रतिनिधींचे डॉ. तुषार रंधे, बाजार समितीचे सभापती के. डी. पाटील, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, तरडी येथील गटनेते सुनील पाटील, भोरटेक येथील बाळू पाटील, हिसाळे येथील विकास पाटील व लाभार्थी शेतकऱ्यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT