poison 2.jpg
poison 2.jpg 
उत्तर महाराष्ट्र

कर्जबाजारपणाला कंटाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या

दीपक खैरनार

जायखेडा, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील सारदे येथील शिवाजी निंबा कापडणीस (५५) यांनी सततची नापिकी व हातउसनवार घेतलेले पैसे तसेच बॅकेचे कर्ज, कांदा पिकाचे घसरते भाव अशा एक ना अनेक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात घराजवळ विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली 

शिवाजी कापडणीस यांची सारदे येथे पत्नी वडिलांच्या नावे दहा एकर शेती असून घरातील एकूलता कर्ता पुरूष होते. पत्नीच्या नावे साधारणपणे २ लाख पासष्ट हजार तर वडिलांच्या नावे अंदाजे दहा लाखांचे कर्ज असल्याचे सांगितले जाते. शेतीमालाला हमीभाव मिळत नसून उत्पादन खर्च निघत नसल्याने कर्ज फेडावे तरी कसे या विवेचनात कापडणीस सापडले होते. सततची नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ऊंबरडू शिवारातील गट नंबर ४४ मधील राहत्या घराजवळ दुपारी तीनच्या सुमारास विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

दोन एकर कांदा पिकास अत्यल्प भाव मिळाला या विचारात कापडणीस होते. दहा एकर क्षेत्रात सततची नापिकी व हात उसनवार घेतलेले पैसे फेडावे तरी कसे या विवंचनेत गेल्या तीन चार दिवसांपासून सस्त झाले होते. पोलीस पाटील स्वप्निल देवरे यांनी पोलीस ठाण्यात आत्महत्येची माहिती दिली. जायखेडा पोलीस ठाण्यातील पोलीस  यांनी घटनास्थळी धाव घेतली. नामपूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय आधिकारी डाॅ.दिपक पाटील, गणेश आहिरे यांनी शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.जायखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नामपूर दूरक्षेत्र उपनिरीक्षक एस.बी.मोरे, पो.ना.सुनिल पाटील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT