उत्तर महाराष्ट्र

मुलीला आपल्या सासरी सोडुन परतणाऱ्या पित्याचा अपघाती मृत्यु

दीपक कच्छवा

मेहुणबारे : मुलीला सासरी सोडुन आपल्या गावी परतणाऱ्या घराकडे पित्याचा अपघाती मृत्यू झाला.चाळीसगाव मालेगाव रसत्यावरील  टाकळी प्र.दे. व पिलखोडच्या दरम्यान दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने अपघातात कळवाडी (ता.मालेगाव) येथील एक जण ठार झाल्याची घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

कळवाडी (ता.मालेगाव) येथील रघुनाथ भावराव देसले ( 50) हे आज (ता.30) रोजी सकाळी दहा वाजता मुलगी शारदा हिला तिच्या सासरी चिंचखेडा (ता.चाळीसगाव) येथे सोडविण्यास दुचाकीवर गेले होते. मुलीला सोडुन सायंकाळी चार वाजता आपल्या गावी कळवाडी येथे दुचाकी क्रमांक( MH.41. 187) वरून जात असतांना टाकळी प्र.दे.व पिलखोड या दरम्यान मालेगावकडुन भरधाव वेगाने येणारा ट्रक( क्रमांक GJ. 27 V. 6399) हा चालकाने भरधाव वेगाने आणत दुचाकीला जोरदार धडक दिली यात रघुनाथ देसले यांना डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने जागीच ठार झाले. या घटनास्थळावरून ट्रक चालक ट्रक घेऊन फरार झाला.त्यानंतर टाकळी प्र.दे. येथील ग्रामस्थांनी ट्रकचा पाठलाग करून आडगाव गावाजवळ पकडला मात्र ट्रक चालक हा फरार झाला होता. घटनास्थळी मेहुणबारे पोलिस  ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कमलेश राजपुत यांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदन करण्यासाठी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी मधुकर देसले यांनी दिलेल्या तक्ररारीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT