The felicitation ceremony of the newly newly appointed Tahsildar and Police Inspector of Balgan taluka
The felicitation ceremony of the newly newly appointed Tahsildar and Police Inspector of Balgan taluka 
उत्तर महाराष्ट्र

बागलाण तालुक्याचे नवनियुक्त तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांचा सत्कार समारंभ

सकाळवृत्तसेवा

सटाणा  : पत्रकारांच्या लेखनीमध्ये मोठी ताकद असून त्यापुढे महासत्तादेखील डगमगल्या आहेत. निर्भीड लेखन ही पत्रकारितेची मोठी शक्ती आहे. त्याचा वापर समाजाच्या हितासाठी झाल्यास विकास साधण्यास मदत होते, असे प्रतिपादन बागलाणचे नवनियुक्त तहसीलदार प्रमोद हिले यांनी आज रविवार (ता. 10) येथे केले.

येथील शासकीय विश्रामगृहावर बागलाण तालुका मराठी पत्रकार संघातर्फे बागलाण तालुक्याचे नवनियुक्त तहसीलदार प्रमोद हिले व सटाणा पोलिस ठाण्याचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. सत्काराला उत्तर देताना तहसीलदार श्री. हिले बोलत होते. अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार विश्वास चंद्रात्रे होते. 

श्री. हिले म्हणाले, पत्रकार हा शासन आणि समाज यातील प्रमुख दुवा असून दोन्ही उणीवा शोधून एक सकारात्मक वाटचाल करण्याकडे पत्रकारांची एक भूमिका महत्वाची राहिलेली आहे. माध्यमांनी लेखनीची ताकद समाजाच्या हितासाठी वापरावी, त्यामुळे विकासात मोठी मदत होईल, वर्तमानपत्रामध्ये समाजप्रबोधन करण्याचे सामर्थ्य असल्याने पत्रकारितेतून समाजाला आत्मभान देण्याची गरज असल्याचेही श्री. हिले यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना पोलिस निरीक्षक वासुदेव देसले म्हणाले, लोकशाहीत पत्रकार हे चौथा आधारस्तंभ असतात. आणि पोलिस व जनता यामध्ये संवाद वाढविण्यासाठी पत्रकाराची भूमिका महत्त्वाची असते. म्हणून पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारिता करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. बागलाण तालुक्यात सकारात्मक पत्रकारिता असल्याने पोलिस विभागाला उत्तम सहकार्य मिळेल यात शंका नाही. ज्या काही चांगल्या गोष्टी घडतात त्या दाखविण्यावर आणि प्रसिध्दी करण्यावर प्रसार माध्यमांनी भर द्यावा असे आवाहनही श्री. देसले यांनी यावेळी केले. 

तालुकाध्यक्ष विश्वास चंद्रात्रे यांच्या हस्ते तहसीलदार श्री. हिले तर माजी तालुकाध्यक्ष रमेश देसले यांच्या हस्ते पोलिस निरीक्षक श्री. देसले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार कैलास येवला, अंबादास देवरे, पत्रकार संघाचे सरचिटणीस रोशन खैरनार, माजी तालुकाध्यक्ष रमेश देसले, संजय खैरनार, अरुण भामरे, नंदकिशोर शेवाळे, अशोक गायकवाड, रणधीर भामरे, राकेश येवला, प्रफुल्ल कुवर, महेश भामरे आदींसह पत्रकारबांधव उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT