Superintendent of Police Shrikant Dhiware felicitating Rakesh Mali who returned the wallet of cash and jewels. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : रोकड, दागिन्यांची पर्स परत करणाऱ्या युवकाचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महिलेची गहाळ झालेली दागिने व रोकड असलेली पर्स प्रामाणिकपणे परत करणाऱ्या युवकाचा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी रविवारी (ता.१७) सत्कार केला.

हरवलेली पर्स सुरक्षित मिळाल्याने महिलेने समाधान व्यक्त करून युवकाचे आभार मानले.(felicitation to youth who returned wallet of cash jewelry Dhule News )

शहरातील फाशीपूल परिसरातील जिल्हा उद्योग केंद्राजवळील राजेंद्र टी स्टॉल समोरील रस्त्यावर राकेश ऊर्फ पप्पू राजेंद्र माळी (रा. यशवंतनगर, साक्री रोड, धुळे) या युवकाला शनिवारी (ता.१६) दुपारी साडेपाचच्या सुमारास लाल रंगाची लेडीज पर्स बेवारस पडलेली आढळली.

पर्स तपासली असता तीत रोकड व सोन्याचे दागिने असल्याचे निदर्शनास आले. याबाबत राकेश माळी याने तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे यांच्याशी संपर्क साधून पर्स त्यांच्याकडे सुपूर्द केली.

श्री. शिंदे यांनी पर्समधील कागदपत्रांच्या आधारे शोध घेऊन मोनिका जयसिंग राजपूत (रा. फाशीपूल, धुळे) यांना संपर्क केला. दुचाकीवर जाताना पर्स रस्त्यात हरविल्याचे त्यांनी सांगितले. रविवारी (ता.१७) मोनिका राजपूत यांना पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलावून त्यांना पर्स सुपूर्द केली.

पर्समध्ये रोख ७२ हजार रुपये व ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण ८७ हजारांचा मुद्देमाल राकेश माळी या युवकाने प्रामाणिकपणे महिलेला परत दिल्याने पोलिस अधीक्षक धिवरे यांनी त्याचा सत्कार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup: इंग्लंडविरुद्धच्या पराभवाने भारताची चिंता वाढली! सेमीफायनलमधील शेवटच्या जागेसाठी न्यूझीलंडशी शर्यत; पाहा समीकरण

INDW vs ENGW: इंग्लंडविरुद्ध सामना कुठे फिरला, ज्यामुळे भारताचा झाला ४ धावांनी पराभव, हरमनप्रीत कौरने बोलून दाखवली मनातलं दु:ख

Sugarcane Price : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून उसाच्या किमतीत वाढ, आता एका क्विंटलमागे किती रुपये मिळणार?

World Cup 2025, IND vs ENG: भारताला पराभूत करत इंग्लंडने मिळवलं सेमीफायनलचं तिकीट! हरमनप्रीत कौर-स्मृती मानधनाची झुंज व्यर्थ

Worli Fire: वरळीत भीषण आग! अनेक झोपड्या जळाल्या, आगीमागचं नेमकं कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT