fighting  esakal
उत्तर महाराष्ट्र

सामोडेत 2 गटांत हाणामारी; दोन जखमी, 8 जणांवर गुन्हा दाखल

सामोडे येथे गुरुवारी रात्री दोन गटांत हाणामारी झाली.

सकाळ वृत्तसेवा

पिंपळनेर : सामोडे (ता. साक्री) येथे गुरुवारी रात्री दोन गटांत हाणामारी झाली. पिंपळनेर पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, त्यानुसार आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र शंकर शिंदे (वय ५६) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना वेणूबाई शंकर शिंदे, रेखा दीपक शिंदे, विशाल दीपक शिंदे, तुषार दीपक शिंदे यांनी शिवीगाळ, दमदाटी करत काठीने डोक्यावर मारून जखमी केले.

पत्नी व मुलाला देखील बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यात त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोत तुटून नुकसान झाले. परस्परविरोधात रेखाबाई दीपक शिंदे (वय ४२) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की, राजेंद्र शंकर शिंदे, लुकेश राजेंद्र शिंदे, सुरेखा राजेंद्र शिंदे व सुनील भिकन शिंदे यांनी अंगणात येवून वाद घातला. राजेंद्रने काठीने मारहाण केल्याने रेखाबाई या जखमी झाल्या. चौघांनी शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसांत दोघांनी परस्परविरोधी तक्रार दाखल केली असून, पुढील तपास एएसआय बी. आर. पिंपळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skill University Bill: ग्रामीण रोजगाराला मोठा बूस्ट! कौशल्य विद्यापीठ विधेयक परिषदेत मंजूर; लातूर-पुण्यात नवे विद्यापीठ उभारणार

CJI Surya Kant: चक्क सरन्यायाधीशांच्या भावालाच केला फोन; सीजेआय म्हणाले, जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी सोडणार नाही...

Lord Ram Descendants : कोण आहेत प्रभू श्रीरामाचे वंशज? आता कुठे आहेत अन् कशा परिस्थितीत जीवन जगतात? पाहा

खरातचा पत्रकाराच्या हत्येशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा, २ आरोपींचा मृत्यू; आरोपींच्या काकांनी दावे फेटाळले

वैभव सूर्यवंशीने CSK ला दिलं आव्हान; Dhoni च्या संघाला मागील पर्वात दोन्ही सामन्यांत हरवलं होतं, IPL 2026 मध्येही...

SCROLL FOR NEXT