Crackers Godown Dhule City  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Fire News : फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; हल्दीरामची उत्पादनेही जळून खाक, तब्बल दहा लाखांचं नुकसान

या आगीत फटाके, हल्दीरामची उत्पादने (Haldiram Products) जळून खाक झाली आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मालेगाव रोडवर एमआयडीसी आहे. (Malegaon MIDC) तिच्या विरूध्द दिशेला समोर शासकीय अनुदानाचा लाभ घेत काही व्यावसायिकांनी गोदाम उभारले आहे.

धुळे : शहरापासून दक्षिणेला आठ किलो मीटरवर असलेल्या शासकीय अनुदानातील एका गोदामाला आज मंगळवारी (ता. २१) सकाळी अकरा वाजता भीषण आग लागली. या आगीत फटाके, हल्दीरामची उत्पादने (Haldiram Products) जळून खाक झाली आहेत. घटनेत सुमारे दहा लाखांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मालेगाव रोडवर एमआयडीसी आहे. (Malegaon MIDC) तिच्या विरूध्द दिशेला समोर शासकीय अनुदानाचा लाभ घेत काही व्यावसायिकांनी गोदाम उभारले आहे. त्यातील एका गोदामाचे दोन भाग करत योगेश ब्राह्मणकर यांनी अर्ध्या भागात फटाके, तर उर्वरित भागात नंदुरबारस्थित सचिन शर्मा यांनी शाम पुष्प एजन्सीच्या माध्यमातून हल्दीराम कंपनीची निरनिराळी उत्पादने ठेवली होती.

शहरात मंगळवारी ४४.५ अंशावर गेलेले तापमान आणि त्यात शॉर्ट सर्किटमुळे गोदामात फटाके असलेल्या भागाला आग लागली. ती पसरत हल्दीरामची उत्पादने असलेल्या भागाकडे गेली. त्यात दोन्ही गोदामातील सुमारे दहा लाख किमतीचा माल खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेजवळील लळिंग टोल नाक्याकडील अग्निशमनचे चार बंब, तर महापालिकेच्या तीन बंबांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मोहाडी पोलिस ठाण्याचे (Mohadi Police Station) पथक स्थितीवर नियंत्रण ठेऊन होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B व्हिसावर ट्रंप प्रशासनाचा मोठा निर्णय; अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना बसणार मोठा फटका?

India vs Brazil Football: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ब्राझीलचा संघ जाहीर; व्हिनिशियस, राफीन्हा यांचीही ऐतिहासिक लढतीसाठी निवड

Maratha Reservation: ‘मुंबईला जाणारच’; १२ सप्टेंबरच्या बैठकीत कूचची तारीख ठरणार, मनोज जरांगेंचा निर्धार; भाऊबिजेला अमृता फडणवीसांच्या घरी जाणार

MPSC Exam: एमपीएससी परीक्षार्थींसाठी मोठी अपडेट; गट-क पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता ३ जानेवारीला होणार परीक्षा

Nagpur Weather: विदर्भाला उकाड्यापासून मिळणार दिलासा; शुक्रवारनंतर जोरदार पाऊस, तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT