उत्तर महाराष्ट्र

विजेच्या शॉर्ट सर्किटने पाच एकर ऊस जळून खाक

दीपक कच्छवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव)- सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गिरणाकाठ कोरडेठाक पडला आहे. जेमतेम पाण्यावर जगविलेल्या पाच एकर उसाच्या पिकला विजेच्या शॉर्ट सर्किट होऊन आग लागली यात ऊस खाक झाला ही घटना मेहुणबारे (ता. चाळीसगाव)  येथील शेतकरी रविंद्र  वाघ व  प्रमिलाबाई वाघ यांच्या शेतात काल (ता.24) दुपारी दोनच्या सुमारास घडली.

मेहुणबारे गावापासून दोन किमी अंतरावर असलेल्या गिरणा नदी काठावरील रविंद्र वाघ व  प्रमिलाबाई वाघ यांच्या शेतातील उसाला काल दुपारी दोनला वीज तारांच्या शॉट सर्किटने उसाला आग लागली. शेतातील काम करणाऱ्या मजुरांचे अचानक लक्ष गेले.

या घटनेची माहिती वीज वितरण कंपनीला शेत मालकांने दिली. वीज वितरण विभागाने सतर्कता दाखवत विद्दुत पुरवठा बंद केला. परंतु आग विझविण्यासाठी पाणीपुरवठा उपलब्ध नसल्याने काहीही पर्याय नव्हता. काहीवेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. वीज वितरण विभागाच्या कर्मचारी यांना शेतकरी बांधवांनी विनती करून विद्दुत पुरवठा चालू करण्यास सांगितला. शेतकरी बांधवांच्या विनतीने विज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरू केला. विजपंप सुरू करून आजूबाजूच्या शेतकरी व मजूर वर्गाने आग विझविण्याची पुरेपूर प्रयत्न केलेत. परंतु, आग विझविता विझविता तिने रवींद्र वाघ व  प्रमिला वाघ यांचा संपूर्ण पाच एकर ऊस जळून खाक झाला होता. या लागलेल्या आगीमुळे  आजूबाजूला 20 एकरात अनेक शेतकऱ्याचा ऊसाचे पीक उभे असल्याने ही आग पसरते की, काय आशी भीती आजूबाजूच्या शेतकऱ्यामध्ये निर्माण झाली होती.

शॉट सर्किटने लागण्याने आज पाच एकर क्षेत्र जळाले असून या शेतावरून गेलेल्या  विदूत तारा व जमिनीपासून थोड्या अंतरावर आहे. काही ठीकाणी तर ऊसाची पानट देखील या तारांना स्पर्श होते. बरेच कुजलेले खांब आहेत. शेतकर्यांनी याबाबत वेळोवेळी सूचना देवुन देखील वरीष्ठ अधिकारी व लाईनमन यांनी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप केला आहे. या झालेल्या नुकसानीची विज वितरण कंपनीने भरपाई द्यावी आशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT