accident
accident 
उत्तर महाराष्ट्र

मुंबई-आग्रा महामार्गावर अपघातात पाच ठार, तीस जखमी

सकाळवृत्तसेवा

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंतजवळील शिरवाडे फाटा येथे आज (रविवार) सकाळी दोन आयशर टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 5 जण ठार, तर 30 जण जखमी झाले.

नाशिक येथील टाकळी राहुल नगर येथील स्वप्निल कांडेकर याच्या मुलाचा जावळाचा कार्यक्रम केंद्राई देवस्थान (ता.चांदवड) येथे असल्यामुळे नातेवाईकासह हे सर्व जण आयशर क्रमांक (MH.16 Q 3570) या वाहनाने जात असताना पिंपळगाव बसवंत येथुन सात किलोमीटर अंतरावर सकाळी 11:30 वाजता सदर आयशर हा चांदवड दिशेने चालला होता. त्यावेळी समोरून विरूद्ध बाजुने अज्ञान वाहनाने हुलकावणी दिल्याने सदरचा आरशर रस्ता ओलांडून विरूद्ध दिशेच्या रत्यावर गेला असता याच वेळी समोरून भरधाव वेगाने येणारा आयशर टेम्पो क्रमांक (MR.09 GT 2028) याने धडक दिली. या अपघाताची त्रिवता मोठी होती. नाशिकहुन जाणारी आयशरची अवस्था खुप अस्तावस्त झाली. या आयशरमध्ये बसलेले सुशिला सुरेश गवळी (वय 66), निवृती रामभाऊ लोंढे (वय 70), शोभा जगन्नाथ सुर्यवंशी (वय 60) हे जागेवरच ठार झाले. तर सुदाम पाटनकर (वय 66) हे उपचार दरम्यान मयत झाले. हे सर्व नाशिकचे रहिवाशी असून, समृद्धी डांगे (6 महिने) हिचाहि उपचारादरम्यान म्रुत्यु झाला असुन आयशरमधील अन्य तीस जण जखमी झाले.

पिंपळगाव बसवंत येथील राधाकृष्ण, धन्वंतरी, ओम हाॅस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आयशरच्या मागील बाजु बसलेले सर्व जण धडकेमुळे वाहनातुन बाहेर फेकले गेले होते. या अपघातात आयशरचा मागील भाग पुर्ण पणे छिन्न विछिन्न झाला होता. सदर अपघाताची नोंद पिंपळगाव पोलिस ठाण्यात करन्यात आली असुन पुढील तपास करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT