development esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : आधारभूत नकाशा अंतिम; प्रस्तावित जमीन वापर नकाशा होणार तयार

सकाळ वृत्तसेवा

धुळे : महापालिका हद्दवाढ क्षेत्राची प्रारूप विकास योजना (डीपी) तयार करण्याच्या अनुषंगाने हद्दवाढ क्षेत्राचा आधारभूत नकाशा महासभेच्या मान्यतेने अंतिम झाला.

यामुळे हद्दवाढ क्षेत्रातील प्रारूप विकास योजना तयार करण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, आता पुढील प्रक्रिया सुरू होईल. यात आता प्रस्तावित जमीन वापर नकाशा तयार होईल. (for Draft Development Plan base map of demarcation area was finalized with approval of General Assembly dhule news)

५ जानेवारी २०१८ ला धुळे महापालिकेची हद्दवाढ झाली. याद्वारे धुळे शहरालगतची अकरा गावे महापालिका हद्दीत समाविष्ट झाली. वलवाडी, भोकर, महिंदळे, मोराणे, नकाणे, वरखेडी, बाळापूर, पिंप्री, अवधान, चितोड, नगाव (अंशतः) या गावांचा यात समावेश आहे. यामुळे ४६.४६ चौरस किलोमीटर धुळे शहराचा विस्तार १०१.०८ चौरस किलोमीटर एवढा झाला.

हद्दवाढीनंतर या क्षेत्राची प्रारूप विकास योजना तयार करण्याचे काम सुरू झाले. यासाठी शासनाकडून धुळे महापालिकेसाठी नगररचना अधिकारी, विकास योजना, विशेष घटक गठित झाले. या कक्षाकडून पहिल्या टप्प्यात हद्दवाढ क्षेत्राचा आधारभूत नकाशा (बेस मॅप) अर्थात विद्यमान जमीन वापर नकाशा (ईएलयू) तयार करण्यात आला.

हा नकाशा महापालिकेकडे वर्ग करण्यात आला. त्याला अंतिम करण्याच्या अनुषंगाने महासभेच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला. बुधवारी (ता. २९) झालेल्या महापालिकेच्या महासभेने त्याला मंजुरी दिली. त्यामुळे हद्दवाढ क्षेत्राची प्रारूप विकास योजना तयार करण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

आता ‘पीएलयू’ची तयारी

विद्यमान जमीन वापर नकाशा (ईएलयू) अंतिम झाल्यानंतर आता पीएलयू अर्थात प्रस्तावित जमीन वापर नकाशा तयार होईल. यात हद्दवाढ क्षेत्रात भविष्याचा विचार करून जागांचे आरक्षण, रस्त्यांची रुंदी निश्‍चित केली जाईल. अर्थात भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नऊ मीटरचा रस्ता पुढे १२ मीटर, १५ मीटर करणे, खेळाची मैदाने, उद्याने, मार्केट, मोकळ्या जागा, हॉस्पिटल, व्यावसायिक वापर आदी विविध कामांसाठी जागांचे आरक्षण निश्‍चित केले जाईल.

हरकती, सूचना मागविणार

प्रस्तावित जमीन वापर नकाशा तयार झाल्यानंतर तो पुन्हा मंजुरीसाठी महापालिकेच्या महासभेपुढे ठेवला जाईल, तसेच हा नकाशा प्रसिद्ध करून त्यावर नागरिकांच्या हरकती, सूचना मागविल्या जातील. या हरकती, सूचनांवर योग्य ती कार्यवाही झाल्यानंतर विकास योजनेची पुढील प्रक्रिया सुरू होईल.---

गतीने विकासाची अपेक्षा

सद्यःस्थितीत हद्दवाढ क्षेत्रात रस्ते, गटारी, जलवाहिन्या, पथदीप, शौचालये आदी मूलभूत सोयी-सुविधांची वानवा आहे. याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारीही आहेत. त्यातच नव्याने वसाहती उभ्या राहत आहेत. विकास योजना तयार झाल्यानंतर या मूलभूत सोयी-सुविधांबरोबरच इतरही कामांना गती मिळेल अशी अपेक्षा असणार आहे.

शासनाकडून निधी मिळाल्यास ही अपेक्षापूर्तीही गतीने होईल. एकूणच धुळे शहराचा विस्तार वाढला असला तरी या विस्तारित धुळ्याचा विकासही झपाट्याने होईल. परिणामी हद्दवाढ क्षेत्रातील रहिवाशांनाही धुळे शहरात आल्याचे समाधान लाभेल, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओमानमध्ये जहाजावर भारतीयाचा मृत्यू, प्लास्टिकमध्ये गुंडाळून थंड पाण्याच्या बाटल्यांनी झाकलं; मृतदेह सडू लागला, मदत मिळेना

Uddhav Thackeray: मातोश्रीवर बैठकीला ९ पैकी चौघेच आले, सर्वजण ठाकरेंसोबतच राऊतांचा दावा; तरीही ऑपरेशन टायगरची भीती

Latest Marathi News Live Update : नाशिक जिल्हयातील नागा-साक्या धरणाने गाठला तळ

Pune Market Yard: पुणे मार्केट यार्डमध्ये केशर आंब्याला १६७ रुपये प्रतिकिलो भाव; पाच वर्षांतील सर्वोच्च विक्रम

Thane News: थीम केक ठरला जीवघेणा! तीन वर्षांच्या चिमुकलीच्या पोटात धातूच्या पिना; ठाण्यातील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT