Deopur police team present with Bhondu Baba arrested in case of jewellery esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime: दागिन्यांप्रकरणी भोंदूबाबाला अटक; देवपूर पोलिसांची कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime : भविष्य सांगण्याच्या बहाण्याने घरात येऊन हातचलाखीने सोन्याचे दागिने गायब करणाऱ्या भोंदूबाबाला देवपूर पोलिस ठाण्याने अटक केली. त्याच्याकडून सोन्याचे दागदागिने व मोटारसायकल असा ६८ हजारांवर मुद्देमाल हस्तगत केला. (fraud baba arrested in jewelery theft case Performance of Deopur Police Dhule Crime)

नेहरू हाउसिंग सोसायटीतील किरण शेखर जडे (वय ४२) यांच्याकडे २९ जूनला सकाळी साडेदहाच्या सुमारास अनोळखी भोंदूबाबा साधूच्या रूपात भिक्षा मागणे व भविष्य सांगण्याच्या बहाण्याने आला.

तेव्हा त्यांनी भविष्य बघण्यासाठी त्याला घरात बोलविले. त्याने महिलेसह पतीला ‘तुमचे सगळे चांगले करतो,’ असे सांगून हातचलाखीने हातात कुंकू व तांदूळ घेऊन त्याची विभूती राख करून दाखविली. नंतर मंत्रोच्चारात महादेवाची छोटी पिंडी प्रकट करून दाखविली.

‘तुमच्याकडून मला काहीच नको, मी सोन्याची पूजा करून, मंत्र मारून तुमची परीक्षा घ्यायला आलो आहे,’ असे सांगून त्याने ‘तुमच्या अंगावरील सोने द्या, सोबत नेणार नाही व सायंकाळी जेवणासाठी तुमच्या घरी येतो, तुमच्या सोन्याची पूजा करून मंत्र मारून परत देतो, तुम्ही ते सोने परिधान केल्यावर तुमचे कल्याण होईल व सुखी राहाल,’ असे सांगून भोंदूबाबाने विश्‍वास संपादन केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सौ. जडे यांनी भोंदूबाबाच्या सांगण्याप्रमाणे त्याच्याकडे सोन्याचे तीन ग्रॅमचे कानातील टॉप्स व सहा ग्रॅमचे मंगळसूत्र दिले व नंतर तो फरारी झाला. त्याची सायंकाळी जेवणासाठी वाट बघितली; परंतु तो आलाच नाही.

या प्रकरणी सौ. जडे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे भोंदूबाबाचे फोटो मिळविले व माहिती काढली. त्याला एकतानगरातून ताब्यात घेतले. त्याचे नाव नारायण किसन चव्हाण (वय ३५, रा. ओझर खुर्द, ता. जामनेर, जि. जळगाव) असे आहे. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता त्याच्याविरुद्ध जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक हृषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूरचे पोलिस निरीक्षक सतीश घोटेकर, डीबी पथकातील हवालदार पंकज चव्हाण, विश्‍वनाथ शिरसाट, किरण सावळे, सागर थाटसिंगारे, सौरभ कुटे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT