Fraudster arrested with vehicle esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime: भोंदूबाबांच्या आंतरराज्यीय टोळीला ठोकल्या बेड्या!

5 लाख 24 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime : शहरातील विविध भागांत साधू महाराजांचे वेशांतर करून नागरिकांची फसवणूक करत फिरणाऱ्या तीन जणांचा आंतरराज्यीय टोळीला पोलिसांनी अटक केली.

त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच नागरकांची फसवणूक केलेली पाच लाख २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांना काढून दिला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. (fraud baba inter state gang shackled Items worth Rs 5 lakh 24 thousand seized Nandurbar Crime)

जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, नंदुरबार शहरातील बसस्थानक ते भाजीपाला मार्केट परिसरात पांढऱ्या रंगाच्या इको कंपनी गाडी (जीजे ०७, डीडी ५१०९)मधील दोन ते तीन बहुरूपी साधू महाराज लोकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने परिसरात फिरत आहेत.

ही माहिती पोलिस अधीक्षक पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना दिली. त्यांनी पथक तयार करून बातमीची खात्री करून तत्काळ संशयितांना ताब्यात घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.

पथकाने नंदुरबार शहरातील बसस्थानक, भाजी मार्केट, डीएसके मार्केट व परिसरात शोध घेतला असता महाराणा प्रताप पुतळ्याजवळ दोन ते तीन साधू महाराज संशयितरीत्या उभे

असल्याचे दिसून आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्याजवळ जाऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. तसेच ते खरोखरचे साधू महाराज नसल्याचा संशय आला, म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्या ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वाहनात बहुरूपी साधू महाराज बनण्यासाठीचे साहित्य मिळून आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे सुभानाथ शेतानाथ मदारी (वय ५२, रा. स्टेशन रोड, हलोल, जि. पंचमहल, गोध्रा), धिरूनाथ सरकारनाथ मदारी (२५, रा. तय्यबपुरा,

कपडगंज, जि. खेडा), विक्रम कालू परमार (२५, रा. कतवारा, ता.जि. दाहोद, गुजरात) अशी असल्याचे सांगितले. त्यांनी ते बहुरूपी साधू महाराजांचे वेशांतर करून त्यांच्याकडील खोटे रुद्राक्ष लोकांना दाखवून त्यांना बोलण्यात गुंतवून लोकांकडून पैसे, सोन्या-चांदीचे दागिने व इतर वस्तू हातचलाखीने घेऊन त्यांची फसवणूक करण्याबाबत सविस्तर माहिती दिली.

ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींच्या वाहनाची तपासणी केली असता वाहनात १११ खोटे रुद्राक्ष, चंदनाचा लेप असलेली डबी, विविध प्रकारच्या रंगांचे खडे, रुद्राक्ष माळ, साधू महाराज बनण्यासाठी लागणारे कपडे, कापूर, मोबाईल, रोकड व एक चारचाकी वाहन असा एकूण पाच लाख २४ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा; २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

SCROLL FOR NEXT