crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : वृद्धेची 5 लाखांत फसवणूक; 5 जणांवर पिंपळनेरला गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : विविध योजनांचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडत मुदत पूर्ण होऊनदेखील पैसे न देता प्रतापपूर (ता. साक्री) येथील वृद्धेची पाच लाखांत फसवणूक झाली. या प्रकरणी सिट्रस चेकईन कंपनीचालकासह पाच जणांविरुद्ध पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.(Fraud of an old woman for 5 lakhs in dhule crime news)

कस्तुराबाई फकिरा गांगुर्डे (वय ७९, रा. प्रतापपूर) यांनी तक्रारीत म्हटले आहे, की सिट्रस चेकईन कंपनीचे चालक ओमप्रकाश बसंतलाल गोयकर, प्रकाश गणपत उत्तेकर, नटराजन वेंकटरामण, नारायण शिवराम कोटणीस (रा. सिट्रस चेकईन लि. १६.१९, शिल्पीन सेंटर पहिला मजला, ४० जीडी, आंबेडकर मार्ग, वडाळा, मुंबई) व कंपनीचालक देवीदास दौलत महाले (रा. दौलत बिल्डिंग, सटाणा रोड, पिंपळनेर) यांनी कस्तुराबाई यांचा विश्वास संपादन करीत व लेखी आश्वासन देऊन विविध योजनांमध्ये आमिष दाखविले.

गुंतवणूक करण्यास भाग पाडले. कस्तुराबाई यांनी क्रिस्टल ऑप्शन कोम्बो प्लॅनची मुदत सहा वर्षे अशा प्लॅनअंतर्गत पाच लाख १०० रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर मुदत पूर्ण होऊनसुद्धा रक्कम परत देण्यास टाळाटाळ करीत फसवणूक केली, अशी तक्रार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT