Fraud of Rs 67 lakh from Assistant Accountant of Power Distribution Office Nashik News  esakal
उत्तर महाराष्ट्र

वीज वितरण कार्यालयात सहाय्यक लेखापालाकडून ६७ लाखाचा अपहार

धनराज माळी

नंदुरबार : शहादा येथील वीज वितरण कंपनीच्या (power distribution company) कार्यालयातील सहाय्यक लेखापाल (Assistant Accountant) याने ६२ लाख ३७ हजार ६७१ रुपयाचा भरणा बॅकेंत न करता अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत शहादा पोलिस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहादा (Shahada) येथील वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयातील सहाय्यक लेखापाल विजय तुळशीराम लांडगे याने २१ सप्टेंबर २०२० ते ३१ जानेवारी २०२२ या काळात अतिरिक्त भार देऊन लेखापालची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्या कालावधीत त्यांचेकडे विज वितरण कंपनीचे नऊ कोटी ५७ लाख ७७ हजार ३२० रूपयाची रक्कम जमा झाली होती. त्यापैकी त्याने आठ कोटी ९५ लाख ३९ हजार ६४९ रुपये कंपनीच्या खात्यात जमा केले.मात्र ६७ लाख ६७१ रुपये कमी भरून त्या रक्कमेची अफरातफर करून अपहार केला. या बाबत भूषण विठोबा जगताप यांनी शहादा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विजय लांडगे याच्याविरूद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कारला धडकल्यानंतर पिकअपला लागली आग; तिघांचा होरपळून मृत्यू, एक जण गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांची आज कोल्हापुरात महासभा

Supreme Court : 'its very serious issue' सर्वोच्च न्यायालयात वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद, CJI सूर्यकांतही संतापले, खटला अतिशय गंभीर

Maharashtra Winter Update : राज्यातील थंडी गायब की गारठा कायम राहणार? हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज समोर

Semiconductor : सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये ‘स्वदेशी’ झेप; मायक्रोप्रोसेसर ‘ध्रुव-६४’चे लाँचिंग, ‘सीडॅक’ने बनविला आराखडा

SCROLL FOR NEXT