MLA Dr. Vijayakumar gavit esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar : विकास कामांसाठी 5 कोटींचा निधी मंजूर

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात नागरी सेवा व सुविधांची कामे करण्याकरीता नंदुरबार नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १४ व १८ या दोन प्रभागांमधील विविध विकास कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

सदर निधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadanvis) यांनी विशेष प्राधान्य देऊन मंजूर केला असून, यासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. (Fund of 5 crores sanctioned for development works Nandurbar Latest Marathi News)

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) अडीच वर्षाच्या कार्यकाळात नंदुरबार शहराचा सर्वांगीण विकास थांबला होता.

भाजप-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडवणीस यांनी शपथ घेतल्यानंतर कार्यभार सांभाळला असून, राज्यातील नगरपरिषद क्षेत्रातील विकास कामांसाठी निधी मंजूर करून आर्थिक साहाय्य केले आहे.

प्रभाग क्रमांक १४ व १८ या दोन्ही प्रभागांमध्ये विविध विकास कामांना चालना मिळणार आहे. आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने नंदुरबार नगरपरिषद प्रभागांच्या कामांसाठी निधी मंजूर झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Changur Baba : अंगठ्या अन् रत्न विकायचा, ५ वर्षात जमवली १०० कोटींची माया; धर्मांतर रॅकेट प्रकरणी अटक केलेला छांगुर बाबा कोण?

बौद्ध धर्मगुरू दलाई लामांना 'भारतरत्न' देण्याची मागणी; 80 खासदारांनी केली पाठिंबा दर्शवणारी स्वाक्षरी, मोदी सरकार घेणार लवकरच निर्णय?

Guru Purnima 2025 Greeting Card: गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंसाठी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, जाणून घ्या सोपी पद्धत

Oxford Graduate: ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पदवीधर करतोय फूड डिलिव्हरी; दरमहा कमावतोय लाखो रुपये, म्हणाला...

Solapur Crime: निर्दयी मुलाने बापाला चाबकाचे फटके देऊन संपविले, घरात रक्ताचा पाट वाहिला तरी...सोलापूर हादरले !

SCROLL FOR NEXT