Funds Approved News
Funds Approved News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शिरपूर तालुक्यातील रस्त्यांसाठी 5 कोटींची निधी मंजूर

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर (जि. धुळे) : येथील माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशीराम पावरा यांच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यात ग्रामीण भागातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरण (Concretization) व अन्य सोयीसुविधांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी (Fund) मंजूर करण्यात आला. (fund of Rs 5 crore was approved for concreting roads other facilities in rural areas dhule news)

ग्रामविकास विभागाने तीन फेब्रुवारीला जाहीर केलेल्या शासन निर्णयात अनुसूची २५१५, १२३८ अंतर्गत तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे होणार्‍या विकास कामांसाठी पाच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.

येथे होतील विकासकामे

फत्तेपूर फॉरेस्ट, गधडदेव, चाकडू, बुडकी, बुडकी विहीर (टेंभेपाडा), उमर्दा, पळासनेर (अमरधाम रस्ता), न्यू बोराडी, खार्‍यापाडा (टेंभेपाडा), पनाखेड, अमरीशनगर (आंबे), हिगाव, रोहिणी, लाकड्या हनुमान, नटवाडे, सुळे, येथे रस्ता काँक्रीटीकरणासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये,

तिखीबर्डी, हनुमानपाडा (उमर्दा), सांगवी गाव, खंबाळे गावासाठी, चिलारे, सुभाष नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण व अन्य सुविधांसाठी १५ लाख रुपये, बलकुवे येथे सामाजिक सभागृह बांधण्यासाठी १५ लाख रुपये, बोराडी येथे ओपन जिम साहित्य बसविण्यासाठी पाच लाख रुपये,

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

नवी अंतुर्ली येथे काँक्रीट रस्त्यासाठी १५ लाख रुपये, भटाणे काँक्रीट रस्त्यासाठी १० लाख रुपये, वरूळ काँक्रीट रस्त्यासाठी साडेसात लाख, लोंढरे येथे काँक्रीट रस्त्यासाठी साडेसात लाख, बाभुळदे येथे गावअंतर्गत सोई सुविधांसाठी १० लाख रुपये, टेंभे बु. येथे १० लाख रुपये,

करवंद येथील गोरक्षनाथ मंदिर येथे सोई सुविधांसाठी १५ लाख रुपये, करवंद येथे काँक्रीट रस्त्यासाठी १५ लाख रुपये, शिंगावे येथे काँक्रीट रस्त्यासाठी १० लाख रुपये, कळमसरे येथे काँक्रीट रस्त्यासाठी १० लाख रुपये, उंटावद येथे सभामंडप बांधण्यासाठी १० लाख रुपये, पिंप्री येथे गावअंतर्गत सोई सुविधांसाठी १० लाख रुपये,

हिसाळे गावात मलखान नगर येथे सोई सुविधांसाठी १० लाख रुपये, बभळाज येथे गावांतर्गत सोई सुविधांसाठी १० लाख रुपये, होळ येथे काँक्रीट रस्त्यासाठी १५ लाख, भाटपुरा येथे काँक्रीट रस्त्यासाठी १० लाख रुपये, मांजरोद येथे काँक्रीट रस्त्यासाठी १५ लाख रुपये, सावळदे गावांतर्गत राष्ट्रीय महामार्ग ते कै. सुभाष जिभाऊ यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्त्यासाठी १५ लाख रुपये, कै.सुभाष जिभाऊ यांच्या घरापासून तापी नदीकडील रस्त्यापर्यंत काँक्रीटीकरणासाठी १५ लाख रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT