Action Squad with Prashant Bachhav present at the Superintendent of Police's office along with three suspects of the robbery. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : रस्ता लुटारुंची टोळी गजाआड

निखिल सूर्यवंशी - सकाळ वृत्तसेवा

धुळे : महाविद्यालयीन तरुण, तरुणींना चाकूचा धाक दाखवून लूट करणाऱ्या (Robbers) देवपूरमधील टोळीला एलसीबीच्या पथकाने गजाआड केले. त्यांच्याकडून पाऊणलाख किमतीचे सोन्याचे दागिने आणि शस्त्र जप्त (Seized) करण्यात आले. (gang of road robbers has cought by dhule police Dhule Crime News)

देवपूरमधील दत्तमंदिराजवळील सुयोग नगरातील गायत्री राकेश महाजन (वय २१) या तरुणीला एक जुलैला चाकूचा धाक दाखवून तिच्याकडील दागिने लुटण्यात आले. तसेच ऊस गल्लीतील (जुना आग्रा रोड) येथील अनिरुद्ध अतुल बागूल (वय १९) या तरुणाने अशीच फिर्याद दिली होती. शहरातील कमी वर्दळीच्या रस्त्यांवर महाविद्यालयीन तरुण- तरुणींना गाठून त्यांना चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीने काही दिवसांपासून धुमाकूळ घातला होता. पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी एलसीबीचे प्रमुख पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना असे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन करत सूचना दिल्या. यात वडेल रोड परिसरात सुनील रामू मरसाळे (रा. प्रियदर्शनीनगर, नगावबारी, देवपूर) याने त्याच्या साथीदारासह चाकूचा धाक दाखवून दोन जुलैला रात्री एकाकडून सोन्याचे दागिने आणि पैसे काढून घेतल्याची माहिती निरीक्षक पाटील यांना मिळाली.

याआधारे एलसीबी पथकाने सुनील मरसाळे, गणेश जुगनू मराठे (वय २१, रा. नेहरूनगर, पाण्याच्या टाकीच्या बाजूला, देवपूर), मोहित अजयकुमार चव्हाण (वय २४, नवनाथ नगर, गजानन महाराज मंदिराजवळ, देवपूर) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांनी कसून चौकशीत गुन्ह्यांची कबुली दिली. त्यात एक जुलैला सकाळी अकराला वडेल- नगावबारी- गोंदूर चौफुलीवर मोहित चव्हाणसह तिघांनी दोन महाविद्यालयीन तरुणांना चाकूचा धाक दाखवून सोन्याची चैन, पैसे, सुनील आणि मोहितने एक जुलैला सायंकाळी साडेपाचला वडेल चौफुलीजवळ विहिरीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी दोन मुली स्कुटीजवळ फोटो काढत असताना त्यांनाही चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटले. संशयितांकडून चाकूसह ७२ हजार ५०० रुपये किमतीचा दागदागिन्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एलसीबीचे सहाय्यक अधिकारी प्रकाश पाटील, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, योगेश राऊत, हवालदार अशोक पाटील, संजय पाटील, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रवीकिरण राठोड, विशाल पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: यवतमाळमध्ये भाजपला धक्का, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठ्या नेत्याच्या पत्नीचा पराभव

Pune Nagradhyakhsa : पुण्यात फक्त अजितदादा! १७ पैकी १० नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे, महाविकासआघाडीचा सुपडा साफ

New Year Travel Tips: शिमला-कुल्लु-मनाली? नवीन वर्षात हिल स्टेशनला जाण्याचा विचार करत असाल तर 'या' चुका करु नका

शुभमन गिलसोबत विश्वासघात! T20 World Cup संघातून हाकलल्याचे केव्हा सांगितले? आत्ताची मोठी अपडेट

Latest Marathi News Live Update: २६ डिसेंबर २०२५ पासून लागू होणार रेल्वेचे नवीन भाडे नियम

SCROLL FOR NEXT