Gharkul tender scam sakal
उत्तर महाराष्ट्र

Gharkul Yojana : 3 वर्षांत केवळ 316 घरकुलांचे काम पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : राज्य शासनाच्या रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत धुळे महापालिकेच्या माध्यमातून शहरात २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन वर्षांत आतापर्यंत ३१६ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. (gharkul yojana Only 316 house construction completed in 3 years dhule news)

त्या-त्या वर्षात मंजूर एकूण घरकुलांपैकी शंभर टक्के उद्दिष्ट मात्र पूर्ण झाल्याचे दिसत नाही. अर्थात मंजूर लाभार्थी, प्रत्यक्षात अनुदानवाटप लाभार्थी व पूर्ण झालेली घरकुले याची आकडेवारी पाहता मंजूर घरकुलांपैकी शंभर टक्के घरकुलांची कामे होत नसल्याचे दिसते. दरम्यान, २०१२१-२२ व २०२२-२३ या वर्षांसाठी नव्याने ६०० घरकुलांचे उद्दिष्ट आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी राज्य शासनाने रमाई आवास घरकुल योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शहरी भागासाठी तीन लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्याला घरकुल बांधण्यासाठी अडीच लाख रुपये अनुदान दिले जाते.

धुळे महापालिकेच्या माध्यमातून शहरात ही योजना राबविली जात आहे. २०१७-१८ पासून गेल्या तीन वर्षांत मंजूर लाभार्थीसंख्या, प्रत्यक्षात अनुदानवाटप व पूर्ण झालेली घरकुले याची आकडेवारी पाहता मंजूर घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण होताना दिसत नाही. ही प्रक्रिया अधिक वेगाने होणे गरजेचे आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

३१६ घरकुले पूर्ण

२०१७-१८ मध्ये ५४ घरकुले मंजूर होती. प्रत्यक्षात ५० लाभार्थ्यांना अनुदानवाटप झाले. त्यातील ४६ लाभार्थ्यांची घरकुले पूर्ण झाली. लाभार्थी मृत होणे व इतर कारणांनी उर्वरित चार घरकुले पूर्ण होऊ शकली नाहीत. २०१८-१९ या आर्थिक वर्षात ५० घरकुले मंजूर होती. त्यांपैकी ३६ लाभार्थ्यांना अनुदानवाटप झाले.

त्यातील ३० लाभार्थ्यांची घरकुले पूर्ण झाली, तर २०१८-१९ या आर्थिक वर्षात मंजूर घरकुलांची संख्या ७०४ होती. त्यातील ४३० लाभार्थ्यांना अनुदान उपलब्ध झाले.

या सर्व ४३० लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित झाला. त्यातील ३६२ लाभार्थ्यांनी लिंटेल लेव्हलपर्यंत बांधकाम पूर्ण केल्यानंतर त्यांना योजनेचा दुसरा हप्ता वितरित झाला. दरम्यान, या ४३० पैकी आतापर्यंत २४० घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत.

नवीन सहाशे उद्दिष्ट

दरम्यान, २०२१-२२ साठी एकूण १००, तर २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ५०० घरकुलांचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टातील लाभार्थी निवडीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून अर्जांच्या छाननीचे काम सध्या सुरू असल्याने यादी प्राप्त झाली नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. योजनेंतर्गत अनुदान प्राप्तीबाबतही काही अडचणी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तीन वर्षांतील स्थिती

मंजूर घरकुले...८०८

घरकुले पूर्ण...३१६

योजनेचे हप्ते असे

पहिला हप्ता...५० टक्के

दुसरा हप्ता...४० टक्के

तिसरा (शेवटचा) हप्ता...१० टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT