Neighboring Zilla Parishad Chairperson Dr. Supriya Gavit and others, while women and sarpanch-sub-sarpanch present in the second photograph. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : 5 हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावाला काँक्रीटच्या रस्त्याचे गिफ्ट

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : महिला बचतगटांतील सुमारे पाच हजार महिलांना विविध प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून रोजगार देण्याचे उद्दिष्ट असून, आदिवासींप्रमाणेच बिगरआदिवासी महिलांनादेखील त्यात प्राधान्य दिले जाणार आहे.

त्याचबरोबर पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावाला काँक्रीटचा पक्का रस्ता देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे. (Gift of concrete road to village of more than 5 thousand population nandurbar news)

दरम्यान, ज्या गावांना दुष्काळ जाहीर झाला तेथील शेतकरी ग्रामस्थांनी योजनांचा व शासकीय सवलतींचा योग्य लाभ घ्यावा, असे आवाहनही केले.

नंदुरबार तालुक्यातील दोनशेहून अधिक कामांचे आणि शहादा तालुक्यातील २५० हून अधिक कामांसंदर्भातील आदेश पत्राचे वाटप सरपंच-उपसरपंच मेळाव्यात आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले.

नंदुरबार व शहादा येथे पार पडलेल्या त्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. संसदरत्न खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. सुप्रिया गावित म्हणाल्या, की प्रत्येक गावात रस्ते विकास व्हावा, प्रत्येक गावातील पाणीप्रश्न सोडविला जावा यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत आणि प्रत्येक योजना गावागावांत पोचविली आहे.

तथापि, मंजूर झालेल्या त्या सर्व विकासकामांची पूर्तता संबंधित प्रत्येक ग्रामपंचायतीने वेळेत करून निधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन यांनी आवाहन केले.

खासदार डॉ. हीना गावित म्हणाल्या, की भारतीय जनता पक्षाचे केंद्र आणि राज्य सरकार गाव विकासाला प्राधान्य देऊन घरकुल वाटप, बचतगटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार, पक्क्या रस्त्यांची निर्मिती, हर घर नल से जल या सारख्या विविध योजना राबवत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने कागदपत्रांची पूर्तता करून घेत ग्रामस्थांना लाभ करून द्यावा, असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: What a Catch! शुभमन गिलचा श्रीलंकेला स्तब्ध करणारा झेल, भारताच्या फिरकीसमोर यजमान फेल! Video Viral

Loggerhead Turtle: अरबी समुद्रातून १०० किलो वजनाच्या दुर्मिळ 'लॉगरहेड' कासवाची सुटका

Pune Bengaluru Highway : पुणे-बंगळूर 'ग्रीनफिल्ड हाय-वे' अधांतरी! गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट रखडला? महामार्गाचे रेखांकनही थांबवले, PM कार्यालयाकडून मान्यता का नाही?

पदवीदान सोहळ्याला जायचा प्रश्नच नाही; NALSARच्या निमंत्रणावर CJI सूर्यकांत यांची प्रतिक्रिया

Marathi News Live Updates : पालघरच्या बोईसर MIDC मधील कंपनीत स्फोट, काही कामगार जखमी

SCROLL FOR NEXT