प्रज्ञा कोल्हे
प्रज्ञा कोल्हे 
उत्तर महाराष्ट्र

एमआर लसीकरणाचा अतिडोस; अंदरसूलला मुलीचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

येवला - गोवर-रुबेला (एमआर) लसीकरणाबाबत विविध ठिकाणी गैरसमज असतानाच ही लस घेतल्यानंतर आठ दिवसांनी त्रास होऊन आठवर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी पोलिसांकडे केली आहे. अंदरसूल येथे हा प्रकार घडला असून, आरोग्याधिकाऱ्यांनी मात्र लसीकरणामुळे मुलीचा मृत्यू झाला नसल्याची माहिती दिली.

अंदरसूल येथील मन्याडथडी जिल्हा परिषद शाळेत सुरेंद्र कोल्हे यांची मुलगी प्रज्ञा (वय ८) दुसरीच्या वर्गात शिकत होती. या शाळेत २८ नोव्हेंबरला अंदरसूल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना लस दिली. यानंतर आठ दिवसांनंतर प्रज्ञाला त्रास जाणवू लागला व लस दिलेला हात जड पडून चेहराही फिरला. घाबरलेल्या पालकांनी तिला कोपरगाव येथे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले, तर डॉक्‍टरांच्या सल्ल्याने विविध चाचण्या केल्या. अहवालात काहीही आढळले नाही. मात्र, प्रज्ञा मेंदूवरील संतुलन हरवून अबोल झाली. त्यामुळे घाबरलेल्या पालकांनी तिला नाशिक येथील सोपान हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जन डॉ. संजय वराडे यांच्याकडे उपचारासाठी दाखल केले. येथे तब्बल १४ दिवस उपचार झाले. मात्र, सुधारणा होत नसल्याने प्रज्ञाला मुंबईला नेण्यासाठी घरी आणण्यात आले. मंगळवारी (ता. १) रात्री दोनच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. डॉक्‍टरांनी मुंबई येथील लॅबमध्ये मेडिकल रिपोर्ट तपासणीसाठी पाठवला. यात लसीकरणाचा अतिडोस दिला गेल्याचे नमूद असल्याचा आरोप वडील सुरेंद्र कोल्हे यांनी केला. अतिडोस देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पोलिसांकडे दिलेल्या तक्रार अर्जात केली आहे.

मुलीचा मृत्यू लसीकरणामुळे झालेला नाही. लसीकरण देणाऱ्या परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्व वयोगटातील मुलांना सारखाच डोस देण्यात येतो. लस दिल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत मुलांना त्रास होण्याची शक्‍यता असते. यामुळे आमचे कर्मचारी प्रत्येक ठिकाणी थांबूनही राहतात. सोपान हॉस्पिटल व मुंबईच्या लॅबने दिलेल्या अहवालात लसीकरणामुळे असा प्रकार झाल्याचा उल्लेख नाही.
- डॉ. पी. व्ही. वेदपाठक, तालुका आरोग्य अधिकारी, येवला

कुठल्याही मुलाचे वजन, उंची, शारीरिक परिस्थिती बघून लसीचा डोस द्यावयास पाहिजे. मात्र, सर्वांनाच सारखा डोस दिला व मुलीला लसीचा अतिडोस दिल्यानेच मृत्यू झाला. दुसऱ्या माता-पित्यांवर असे दुःख येऊ नये, याची काळजी घ्यावी आणि माझ्या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत एवढीच माझी अपेक्षा आहे.
- सुरेंद्र कोल्हे, मुलीचे वडील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT